Join us

लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरबरोबर दिसला रणवीर सिंग; फोटो झाला वायरल

सचिन लॉर्ड्सवर सामना पाहत असताना त्याची बॉलीवूड स्टार रणवीर सिंगने भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 17:37 IST

Open in App
ठळक मुद्देरणवीर लॉर्ड्सवर का गेला, माहिती आहे का...

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. लॉर्ड्सवर सामना असला की बरेच माजी क्रिकेटपटू या क्रिकेटच्या पंढरीला उपस्थिती लावतात. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरही त्यापैकी एक. सचिन लॉर्ड्सवर सामना पाहत असताना त्याची बॉलीवूड स्टार रणवीर सिंगने भेट घेतली. यावेळी रणवीरने सचिनसह दिग्दर्शक कबीर खान यांच्यासमवेत एक फोटो काढला. हा फोटो रणवीरने आपल्या ट्विटवर हँडलवर पोस्ट केला आहे.

हे पाहा ट्विट

 

रणवीर लॉर्ड्सवर का गेला, माहिती आहे का...भारताने कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली 1983 साली लॉर्ड्सवर विश्वचषकाला गवसणी घातली होती. या विश्वविजयापासून बऱ्याच महान क्रिकेटपटूंनी प्रेरणा घेतली होती. त्यामुळे या विश्वचषकावर आता एक सिनेमा येत आहे आणि यामध्ये रणवीर काम करणार आहे. त्यासाठी रणवीर सध्या लॉर्ड्सवर सिनेमाच्या कामासाठी गेला आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकररणवीर सिंगक्रिकेटकरमणूक