Ranji Trophy Semi Final: मुंबईच्या गोलंदाजांची कमाल पण रहाणे-अय्यर ढेपाळले; तामिळनाडूचे पुनरागमन

mumbai vs tamil nadu ranji semi final: मुंबईत तामिळनाडू आणि मुंबई यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:10 PM2024-03-03T12:10:10+5:302024-03-03T12:11:13+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy Semi Final mumbai vs tamil nadu Tushar Deshpande and Shardul Thakur bowled well but Mumbai skipper Ajinkya Rahane was dismissed for 19 and Shreyas Iyer for 3 runs | Ranji Trophy Semi Final: मुंबईच्या गोलंदाजांची कमाल पण रहाणे-अय्यर ढेपाळले; तामिळनाडूचे पुनरागमन

Ranji Trophy Semi Final: मुंबईच्या गोलंदाजांची कमाल पण रहाणे-अय्यर ढेपाळले; तामिळनाडूचे पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy Semifinal। मुंबई: रणजी ट्रॉफीमध्ये शनिवारपासून मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात उपांत्य सामना खेळवला जात आहे. अंतिम फेरीचे तिकिट मिळवण्यासाठी दोन्हीही संघ मैदानात आहे. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यर आपल्या संघासोबत जोडला गेला आहे. मात्र, अय्यरला काही साजेशी कामगिरी करता आला नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना पाहुण्या तामिळनाडू संघाला अवघ्या १४६ धावांत रोखले. मुंबईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर (२), मुशीर खान (२), तनुश कोटियन (२) आणि मोहित अवस्थीला (१) बळी घेण्यात यश आले. 

तामिळनाडूकडून एकाही खेळाडूला अर्धशतकी खेळी करता आली नाही. संघाकडून विजय शंकरने सर्वाधिक ४४ धावा केल्या पण त्याला शार्दुल ठाकूरने बाहेरचा रस्ता दाखवला. अखेर पाहुणा संघ ६४.१ षटकांत अवघ्या १४६ धावांवर सर्वबाद झाला. तामिळनाडूचा संघ पहिल्या डावात स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी मुंबईच्या संघाकडे होती. मात्र, यजमानांना देखील साजेशी कामगिरी करता आली नाही. 

रहाणे-अय्यर ढेपाळले
तामिळनाडूने १४६ धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या मुंबईला सुरूवातीपासूनच मोठे धक्के बसले. अवघ्या ५ धावांवर पृथ्वी शॉच्या रूपात पहिला झटका बसला. त्यानंतर संघाच्या ४० धावांवर मुंबईचा दुसरा गडी बाद झाला. मुंबईकडून मुशीर खानने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली पण त्याला साई किशोरने जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे (६७ चेंडू १९ धावा) आणि श्रेयस अय्यर (८ चेंडू ३ धावा) करून बाद झाला. रहाणेला साई किशोरने तर अय्यरला संदीप वॉरियरने बाद केले. 

५०.२ षटकांपर्यंत मुंबईच्या संघाची धावसंख्या ७ बाद १२५ एवढी आहे. एकूणच गोलंदाजांनी कमाल करूनही मुंबईला चांगली आघाडी घेता आली नाही. खरं तर आता मुंबईसमोर प्रतिस्पर्धी संघाने केलेल्या धावांची बरोबरी करण्याचेही मोठे आव्हान आहे. आताच्या घडीला शार्दुल ठाकूर आणि हार्दिक तमोर मुंबईचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Web Title: Ranji Trophy Semi Final mumbai vs tamil nadu Tushar Deshpande and Shardul Thakur bowled well but Mumbai skipper Ajinkya Rahane was dismissed for 19 and Shreyas Iyer for 3 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.