रणजी ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या ताफ्यातून मैदानात उतरला आहे. जम्मू काश्मीर विरुद्धच्या लढतीत पहिल्या डावात स्वस्तात बाद झालेल्या रोहितनं दुसऱ्या डावात अप्रतिम फटकेबाजी केली. पहिल्या डावात ज्या गोलंदाजानं विकेट घेतली त्याच्यावरही तो तुटून पडला.
सिक्सर मारून विकेट घेणाऱ्या गोलंदाजावर राग काढला, पण...
यावेळी जवळपास १०० दिवसांनी त्याच्या भात्यातून त्याचा सिग्नेचर पुल शॉट पाहायला मिळाला. हा फटका त्याने पहिल्या डावात विकेट घेणाऱ्या उमर नझीर मीर याच्या गोलंदाजीवरच मारला. पहिल्या डावात स्वस्तात बाद करणाऱ्या गोलंदाजीवर राग काढताना त्याने काही सुंदर फटके मारले. पण चांगली सुरुवात मिळाल्यावरही त्याची खेळी २८ धावांवरच आटोपली. पुन्हा एकदा अर्धशतकाशिवायच त्याची इनिंग संपली.
चांगली सुरुवात मिळाल्यावर 'आळस' नडला; सोपा झेल देऊन रोहित तंबूत परतला
मुंबईच्या डावाची सुरुवात करताना रोहित शर्मानं आक्रमक अंदाजात सुरुवात केली. दुसऱ्या डावात हिटमॅनन रोहित शर्मानं आपल्या भात्यातून सुंदर फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याची ही फटकेबाजी पाहून तो मोठी खेळी करून फ्लॉप शोचा सिलसिला संपवण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते. पण युधवीर सिंगच्या गोलंदाजीवर तो फसला. मुंबई संघाच्या धावफलकावर ५४ धावा लागल्या असताना रोहित शर्मानं अगदी लेझी शॉट खेळल्याचे पाहायला मिळाले. याची किंमत त्याला आपल्या विकेटच्या स्वरुपात मोजावी लागली.
पुन्हा अर्धशतकाशिवाय तंबूत परतण्याची वेळ
पहिल्या डावात अवघ्या ३ धाव करणारा रोहित शर्मा दुसऱ्या डावात ३१ चेंडूत २८ धावा करून माघारी फिरला. या खेळीत त्याने २ खणखणीत चौकारासह ३ उत्तुंग षटकार मारले. पण पुन्हा तो अर्धशतकाशिवाय तंबूत परल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी जैस्वालच्या साथीनं दुसऱ्या डावात त्याने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली.