Ranji Trophy Final :' द केरळ स्टोरी'; विदर्भ विरुद्ध पहिली फायनल; पहिल्या षटकात पहिली विकेट, अन्...

पहिल्यांदा फायनल खेळणाऱ्या केरळा संघानं फायनल लढतीत दमदार सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:15 IST2025-02-26T10:05:58+5:302025-02-26T10:15:02+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy Final Kerala Captain Sachin Baby Won Toss And Elected Bowl Against Akshay Wadkar led Vidarbha P R Rekhade Duck lbw First Over Nidheesh M D | Ranji Trophy Final :' द केरळ स्टोरी'; विदर्भ विरुद्ध पहिली फायनल; पहिल्या षटकात पहिली विकेट, अन्...

Ranji Trophy Final :' द केरळ स्टोरी'; विदर्भ विरुद्ध पहिली फायनल; पहिल्या षटकात पहिली विकेट, अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext


नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यात रणजी करंडक स्पर्धेतील फायनल लढत रंगली आहे. या सामन्यात केरळचा कर्णधार सचिन बेबी याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अक्षय वाडकरच्या विदर्भ संघाची सुरुवात खराब झाली. कारण पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर विदर्भ संघाची सलामी जोडी फुटली. पार्थ रेखाडे (Parth Rekhade) याला एम. डी. निधीश (MD Nidheesh) याने पहिल्याच षटकात तंबूचा रस्ता दाखवला. पहिली फायनल खेळणाऱ्या केरळसाठी ही एक जबरदस्त सुरुवात आहे. 

पहिली विकेट गमावल्यावर विदर्भनं खास डाव खेळला, पण तो फसवा ठरला

निधीशनं पहिल्यांदा गोलंदाजी घेण्याचा कॅप्टन सचिन बेबीचा निर्णय सार्थ ठरवला. नागपूरच्या मैदानात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना पहिला दिड तासात छोप सोडली तर ठीक नाहीतर निर्णय निर्थक ठरतो, अशी नागपूरची खेळपट्टी आहे. या परिस्थितीत केरळानं गोलंदाजीत दमदार सुरुवात केली. दुसरीकडे पहिली विकेट गमावल्यावर विदर्भ संघानं एक वेगळाच डाव खेळला. चेंडू जुना करण्यासाठी त्यांनी तळात फलंदाजी करणाऱ्या नलकांडेला प्रमोशन दिले. पण निधीशनं त्यालाही स्वस्ता माघारी धाडले. निधीशन दोन विकेट घेत केरळ संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. दुसरीकडे विदर्भ संघासमोर धक्क्यावर धक्क्यातून सावरण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

सचिन बेबीनं टॉस जिंकला; कशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन?

विदर्भ प्लेइंग इलेव्हन) - ध्रुव शौरी, पार्थ रेखाडे, दानिश मालेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर (कर्णधार/विकेट किपर), अक्षय कर्णेवार, हर्ष दुबे, नचिकेत भुते, दर्शन नालकांडे, यश ठाकूर.

केरळ प्लेइंग इलेव्हन-  अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, सचिन बेबी (कर्णधार), जलज सक्सेना, मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), सलमान निजार, अहमद इम्रान, एडन अ‍ॅपल टॉम, आदित्य सरवते, एमडी निधीश, नेदुमंकुझी बेसिल.

Web Title: Ranji Trophy Final Kerala Captain Sachin Baby Won Toss And Elected Bowl Against Akshay Wadkar led Vidarbha P R Rekhade Duck lbw First Over Nidheesh M D

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.