Ruturaj Gaikwad Missed Well Deserving Century Kerala vs Maharashtra Ranji Trophy Match : देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या हंगामाची सुरुवात झाली आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध केरळ यांच्यातील सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं अप्रतिम खेळी करत अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र संघाचा डाव सावरला. अवघ्या १८ धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यावर तो मैदानात तग धरून उभा राहिला. दिवसाअखेर तो शतकी खेळी करेल, असे वाटत असताना ९१ धावांवर तो बाद झाला. त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौघांच्या पदरी भोपळा; १८ धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यावर ऋतुराज चमकला
केरळ विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पृथ्वी शॉ ० (४), अर्शिन कुलकर्णी ० (१) आणि सिद्देशवीर ० (१) हे तिघे एका पाठोपाठ शून्यावर बाद झाले. संघाच्या धावफलकावर ५ धावा लागल्या असताना कर्णधार अंकित बावणेच्या ० (७) रुपात महाराष्ट्र संघाला चौथा धक्का बसला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. १८ धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यावर ऋतुराज गायकवाड याने जलज सक्सेना याच्यासोबत संघालाचा डाव सावणारी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
सहाव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी, पण...
महाराष्ट्राचा संघ अडचणीत असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाड याने सातव्या क्रमांकावरील बॅठर जलज सक्सेना याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली. अर्धशतकाच्या उंबरठयावर सक्सेना १०६ चेंडूत ४९ धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ऋतुराज गायकवाडच्या खेळीलाही ब्रेक लागला. त्याने १५१ चेंडूत ९१ धावांची महत्त्वपूर्ण अन् संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढणारी खेळी केली.
केरळ संघाच्या ताफ्यातीन एमडी निधीशचा 'चौकार'
ऋतुराज आणि सक्सेना जोडीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात १७९ धावा केल्या होत्या. केरळ संघाकडून निधीश याने सर्वाधिक ४ तर बासील २ आणि इडन ॲपल टॉम याने एक विकेट मिळवली.
Web Summary : Ruturaj Gaikwad's resilient 91 helped Maharashtra recover from a disastrous start against Kerala in the Ranji Trophy. After losing early wickets, Gaikwad partnered with Jalaj Saxena, but Kerala's Nidheesh took 4 wickets, restricting Maharashtra to 179/7.
Web Summary : रणजी ट्रॉफी में केरल के खिलाफ महाराष्ट्र की शुरुआत खराब रही, लेकिन ऋतुराज गायकवाड़ के जुझारू 91 रनों ने टीम को संभाला। शुरुआती विकेट गिरने के बाद गायकवाड़ ने जलज सक्सेना के साथ साझेदारी की, लेकिन केरल के निधीश ने 4 विकेट लेकर महाराष्ट्र को 179/7 पर रोक दिया।