आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना २४ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा खेळाडू संजू सॅमसनला दुखापत झाली असून तो आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना संजू सॅमसनला दुखापत झाली. त्यानंतर तो रिटायर हर्ट झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीविरुद्धच्या सुपरओव्हरमध्येही तो फलंदाजीसाठी आला नाही. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही संजू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला.आता तो आरसीबीविरुद्ध खेळणार नसल्याची माहिती समोर आली.
संजू सॅमसन बरे होईपर्यंत राजस्थानमध्ये जयपूर येथील वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहील, तो आरसीबी विरुद्धच्या पुढील सामन्यासाठी बेंगळुरूला जाणार नाही. संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर आणि पुनर्प्राप्तीवर सतत लक्ष ठेवून आहे त्याच्या पुनरागमनाबाबतचा निर्णय प्रत्येक सामन्याच्या आधारावर घेतला जाईल, असे फ्रँचायझीने एका निवेदनात म्हटले आहे.
राजस्थानची आतापर्यंतची कामगिरी
राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, ६ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधून राजस्थानचे बाहेर पडणे जवळजवळ निश्चित आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास कठीण आहे.
Web Title: Rajasthan Royals Sanju Samson ruled out of the RCB match on April 24th
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.