राजस्थान रॉयल्स (RR) आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी नव्या संघ बांधणीचा विचार करत असल्याचे वृत्त सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांनी IPL मधील ट्रेंडिंग विंडोच्या नियामानुसार, RR च्या ताफ्यातील ६ खेळाडूंमध्ये रस दाखवला आहे. या खेळाडूंमध्ये संजू सॅमसनसह अन्य काही खेळाडूंचा समावेश असल्याते समजते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजू CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसणार?
आयपीएलमधील ट्रेडिंग विंडोनुसार, दोन फ्रँचायझी संघ आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी आपापसातील संमतीनुसार, खेळाडूंच्या अदला बदलीचा खेळ खेळू शकतात. या खिडकीतून अर्थात ट्रेडिग विंडो माध्यमातून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. विकेट किपर बॅटरच्या रुपात राजस्थानच्या ताफ्यात ध्रुव जुरेलच्या पर्याय असल्यामुळे संजूला ट्रेडिंग विंडोनुसार, दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. हा खेळ खेळला गेला तर तो CSK च्या ताफ्यातही दिसू शकतो. पण यासंदर्भातील वृत्ताला अद्याप दोन्ही फ्रँचायझी संघाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
CSK अन् KKR च्या संघाला हवाय विकेट किपर बॅटर
आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आयकॉन महेंद्रसिंह धोनी पुढच्या हंगामापर्यंत ४५ वर्षांच्या उंबरठ्यावर असेल. त्याच्यानंतर आश्वासक विकेट किपरची संघाला गरज भासेल. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स क्विंटन डिकॉक आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांच्या जागी नवा विकेट किपर शोधण्यावर भर देईल. हे दोन्ही संघ संजू सॅमसनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते.
मजबूत संघ बांधणीसाठी कायपण...
पीटीआयने सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील ६ खेळाडूंना अनेक फ्रँचायझीकडून वारंवार संपर्क साधण्यात आला आहे. राजस्थानचा संघही ट्रेडिंग विंडोच्या नियमानुसार, खेळाडूंची अदला-बदली करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मजबूत संघ बांधणीसाठी RR जे शक्य ते करण्यासाठी तयार आहे, असा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.