Join us

IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये पहिल्यांदा एखाद्या फलंदाजाने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आहेत. ही कामगिरी रियान परागनं दोन वेगवेगळ्या ओव्हरमध्ये करून दाखवलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 19:14 IST

Open in App

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने मोठा पराक्रम करून दाखवलाय. स्पर्धेतून बाहेर पडल्यावर सन्मानाच्या लढाईत या पठ्ठ्यानं ६ चेंडूत सलग ६ षटकार मारल्याचा खास विक्रम नोंदवला आहे. राजस्थान रॉयल्सच्या डावातील १३ व्या षटकात रियान पराग याने मोईन अलीच्या षटकात पाच चेंडूवर पाच षटकार मारले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर आल्यावरही त्याने षटकार मारला. आयपीएलमध्ये पहिल्यांदा एखाद्या फलंदाजाने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आहेत. ही कामगिरी रियान परागनं दोन वेगवेगळ्या ओव्हरमध्ये करून दाखवलीये.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एक्स अकाउंटवरून व्यक्त केली होती मनातली गोष्ट, जुनं ट्विट व्हायरल

Riyan Parag Viral Tweet

रियान परागनं कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ६ चेंडूत सलग ६ षटकार मारल्याचा पराक्रम करुन दाखवल्यावर त्याचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १४ मार्च २०२३ रोजी रियान परागनं हे ट्विट केले होते. ज्यात त्याने आयपीएलमध्ये एका षटकात ४ षटकार मारण्याची गोष्ट त्याने बोलून दाखवली होती. अंतर्मनातील गोष्ट कोलकाता विरुद्धच्या सामन्यात खरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सटी-20 क्रिकेटइंडियन प्रीमिअर लीग