Join us

बापापेक्षा बेटा सवाई! राहुल द्रविडच्या मुलाने झळकावले वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक

एका वनडे क्रिकेट सामन्यात द्रविडचा मुलगा समितने द्विशतक झळकावल्याची गोष्ट समोर आली आहे. समितचे हे दुसरे द्विशतक ठरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 17:55 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध फलंदाज अशी ख्याती असणाऱ्या राहुल द्रविडच्या मुलाने मोठा पराक्रम केल्याचे समोर आले आहे. एका वनडे क्रिकेट सामन्यात द्रविडचा मुलगा समितने द्विशतक झळकावल्याची गोष्ट समोर आली आहे. समितचे हे दुसरे द्विशतक ठरले आहे.

समितने शालेय क्रिकेट स्पर्धेत हा पराक्रम केला आहे. माल्या अदिती या शाळेकडून समित हा क्रिकेट खेळतो. १४ वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत समितने द्विशतक झळकावले आहे. समितने १४६ चेंडूंत ३३ चौकारांच्या जोरावर २०४ धावांची खेळी साकारली आहे. समितच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या शाळेला प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३७७ धावा करता आल्या होत्या.

समितने ही खेळी श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीविरुद्ध खेळताना द्विशतक झळकावले आहे. समितच्या या द्विशतकाच्या जोरावर त्याच्या शाळेला विजय मिळाला आहे. समितच्या द्विशतकाच्या जोरावर त्याच्या शाळेने ५० षटकांत ३७७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी श्री कुमारन चिल्ड्रन अकादमीच्या संघाला २६७ धावा करता आल्या आणि त्यांनी ११० धावांनी पराबव पत्करावा लागला.

यापूर्वी समितीने २०१९ साली खेळवण्यात आलेल्या झोनल स्पर्धेत २०१ धावा केल्या होत्या. समितने ही खेळी साकारताना २५६ धावांचा सामना केला होता आणि २२ चौकारही लगावले होते. समितचे १४ वर्षांखालील स्पर्धेतील हे पहिले शतक होते. या सामन्यात द्विशतक झळकावल्यावर समितने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ताही दाखवला होता.

टॅग्स :राहूल द्रविड