Rahul Dravid Steps Down As Rajasthan Royals Head Coach : टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड चॅम्पिनय करणाऱ्या राहुल द्रविडनं मोठा अचानक मोठा निर्णय घेतला. आयपीएलच्या आगामी हंगामाआधी द्रविडनं मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजू समॅमसन राजस्थानचा संघ सोडणार अशी चर्चा रंगत होती. पण अचानकच आता द्रविडनं प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठी ऑफर दिली, तरी...
राजस्थान रॉयल्सच्या संघाने जी पोस्ट शेअर केलीये त्यात लिहलंय की, “मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड़ आयपीएल २०२६ पूर्वी फ्रँचायझीबरोबरचा आपला कार्यकाळ संपवणार आहेत. अनेक वर्षांपासून राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांच्या नेतृत्वासह मार्गदर्शनात खेळाडूंच्या एका पिढीवर प्रभाव टाकला आहे. मोठ्या जबाबदारीसह मोठ्या पदाची ऑफर देऊनही द्रविड राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिला.
द्रविडच्या कॅप्टन्सीत राजस्थान संघाने खेळलीये फायनल
२०१२ च्या हंगामात राहुल द्रविड कॅप्टन आणि खेळाडूच्या रुपात राजस्थान ताफ्यात सहभागी झाला. त्याच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये राजस्थानच्या संघाने प्लेऑफ्स गाठली होती. एवढेच नाही तर चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत संघ फायनलमध्ये पोहचला होता. पण ट्रॉफी काही हाती लागलीच नाही. अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन ते अगदी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीपर्यंत अनेक प्रतिभावंत खेळाडू घडवण्यात द्रविडचा मोलाचा वाटा आहे. पण आता तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग नसणार आहे.
राजस्थानच्या संघासोबत बराच काळ काढलाय, पण यावेळी तो वर्षभरही थांबला
IPL मधून निवृत्ती घेतल्यावर २०१४ आणि २०१५ च्या हंगामात द्रविड मेंटॉरच्या रुपात राजस्थान रॉयल्सच्या संघासोबत कनेक्ट झाला. त्यानंतर २०१६ च्या हंगामात तो दिल्लीच्या ताफ्यात सेवा देताना दिसला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यावर तो आयपीएल फ्रँचायझी संघाबातून दूर झाला. भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन केल्यावर द्रविड पुन्हा राजस्थानच्या संघात सामील झाला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये त्याची राजस्थान रॉयल्सच्या संघातील मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण वर्षभराच्या आतच त्याने पदाचा राजीनामा दिला आहे.
Web Title: Rahul Dravid Steps Down As Rajasthan Royals Head Coach Ahead Of IPL 2026
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.