मुंबई : न्यूझीलंडमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियावर मोठी टीका होत असताना, ‘या पराभवासाठी राहुल द्रविड यांनी जबाबदारी घ्यावी,’ असे खळबळजनक वक्तव्य करून बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्वांना धक्का दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार द्रविड यांच्या क्षमतेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) काही अधिकाऱ्यांकडून शंका उपस्थित होत आहे. भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंची न्यूझीलंड दौºयात जुनी दुखापत उफाळून आली आणि यासाठी या अधिकाºयांनी द्रविड यांना जबाबदार ठरवले आहे.
द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) अध्यक्षपदी विराजमान असून खेळाडूंच्या तंदुरुस्तीची जबाबदारी बंगळुरूयेथील या संस्थेकडे असते. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्यातून सावरण्यासाठी त्या खेळाडूला एनसीएमध्ये पाठविण्यात येते. येथे त्याच्या दुखापतीवर उपचार करून योग्य सरावाद्वारे त्या खेळाडूला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज केले जाते. अशा खेळाडूला एनसीएकडून तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय त्या खेळाडूचा टीम इंडियात प्रवेश होत नाही.
परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एनसीएच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे. कारण जो कोणता खेळाडू एनसीएमध्ये गेला, त्यांची दुखापत आणखी बळावली किंवा तो खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. सध्या ईशांत शर्मा या प्रकरणाचे ताजे उदाहरण आहे.
न्यूझीलंड दौºयात पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर लगेच तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला. विशेष म्हणजे पहिल्या कसोटीला सुरुवात होण्याआधी तीन दिवस अगोदर एनसीएने त्याला तंदुरुस्त असल्याचे घोषित केले होते. त्यामुळेच
सध्या बीसीसीआय अधिकारी एनसीए अध्यक्ष राहुल द्रविड यांच्या कार्यप्रणालीवर शंका घेत असून भारताच्या पराभवाची जबाबदारी त्यांनी घ्यावी, असे मत व्यक्त करत आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला कोणत्या आधारावर तंदुरुस्त घोषित केले होते हे पाहावे लागेल. राहुल द्रविड देशातील सर्वात मानाच्या खेळाडूंपैकी एक आहेत, मात्र बीसीसीआय प्रशासन प्रत्येक प्रकरणामध्ये कठोर आहे. एनसीएमध्ये अध्यक्ष द्रविड हेच निर्णय घेत असल्याने याप्रकरणाची जबाबदारीही त्यांनीच घ्यावी.’
>भारत अव्वल स्थानी कायम; कोहली दुसºया स्थानी
दुबई : न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ०-२ ने गमाविल्यानंतरही भारतीय संघ मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. त्याचवेळी, कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत दुसºया स्थानी घसरला. भारतीय संघाच्या खात्यावर ११६ गुणांची नोंद असून दुसºया स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या तुलनेत ६ गुण अधिक आहेत. आॅस्ट्रेलिया १०८ गुणांसह तिसºया स्थानी आहे.
कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत दुसºया स्थानी कायम आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यालाही एका स्थानाचे नुकसान झाले असून त्याची चौथ्या स्थानी घसरण झाली. आॅस्ट्रेलियाचा मार्नुस लाबुशेन तिसºया स्थानी दाखल झाला आहे. गोलंदाजांमध्ये टीम साऊदी अव्वल पाचमध्ये आहे. जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट प्रत्येकी चार स्थानांच्या प्रगतीसह अनुक्रमे सातव्या व नवव्या स्थानी आहेत. (वृत्तसंस्था)
>बुमराह तंदुरुस्त, पण...
याआधी द्रविड यांच्या नेतृत्वाखालील एनसीएने जसप्रीत बुमराहची तंदुरुस्ती चाचणी घेण्यास नकार दिला होता. कारण त्याने खासगी टेÑनरचे मार्गदर्शन घेतले होते. परंतु, यानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेला बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून एनसीएमधून संघात आलेला ईशांत मात्र पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळेच आता एनसीए प्रमुख द्रविड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.