Join us  

IPL 2021 : मुंबई इंडियन्सला मोठा फटका; पाकिस्तानमुळे लागली वाट, जाणून घ्या नेमकं काय झालं

IPL 2021: Quinton de Kock will miss first few matches Big blow to Mumbai Indians Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 6:07 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal challengers Bangalore) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स आणखी एक जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होत असताना त्यांना टेंशन देणारी बातमी गुरुवारी समोर आली. पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामुळे मुंबई इंडियन्सला ( MI) मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा गुरूवारी करण्यात आली. त्यामुळे आता रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) संघाचं टेंशन वाढलं आहे.

सलग तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याची संधी

Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही. MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) पाच जेतेपद पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे. मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

नेमकं काय झालं?आफ्रिकेनं तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), डेव्हिड मीलर, लुंगी एनगिडी, अॅनरीच नॉर्ट्झे, कागिसो रबाडा यांचा समावेश केला आहे. २, ४ व ७ एप्रिल या तारखांना वन डे सामने होणार आहेत आणि त्यानंतर चार सामन्यांची ( १०, १२, १४ व १६ एप्रिल) ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. डी कॉकचा वन डे संघात समावेश केल्यानं तो ७ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय कर्तव्यावर आहे आणि त्यानंतर आयपीएलसाठी भारतात येईल. पण, कोरोनामुळे त्याला किमान ७ दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकेल.   टीम इंडियाच्या 'फिटनेस'मागे इंग्लंडचा हात?, वीरेंद्र सेहवागनं सांगितला १० वर्षांपूर्वीचा मजेशीर किस्सा

ख्रिस लीनला मिळेल संधीमुंबई इंडियन्सचा बॅक अप सलामीवीर ख्रिस लीन मुंबईत दाखल झाला आहे. डी कॉकच्या अनुपस्थितीत तो रोहित शर्मासोबत सुरुवातीच्या काही सामन्यांना सलामीला उतरू शकतो. फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस यांचा वन डे किंवा ट्वेंटी-20 संघात समावेश न केल्यानं ते आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असणार आहेत.   

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians full squad ) - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग 

( IPL 2021 Auction) लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख

 

टॅग्स :आयपीएलमुंबई इंडियन्सक्विन्टन डि कॉकद. आफ्रिकापाकिस्तान