उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

उत्तुंग षटकारांची आतषबाजी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:10 IST2026-01-30T14:10:07+5:302026-01-30T14:10:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Quinton De Kock Blistering Knock Of 115 Runs In 49 Balls Against West Indies With 10 Sixes Equalls Rohit Sharma Record | उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

उधारीची बॅट अन् शतकी रुबाब! क्विंटन डी कॉकनं केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ घरच्या मैदानात वेस्टइंडीजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील  दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिका खिशात घातली. सेंच्युरीयन येथील सुपर स्पोर्ट्स पार्कच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकच्या तुफानी शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं हा विजय साकार केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्विंटन डी कॉकचं विक्रमी शतक अन्...

वेस्ट इंडिजच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावा उभारल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टनच्या  दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७ विकेट्स आणि १५ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. संघाला विजय मिळवून देताना क्विंटन डी कॉकनं हिटमॅन रोहित शर्माच्या विक्रमाशीही बरोबरीचा डाव साधला आहे. त्याच्या या विक्रमी शतकातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याने दुसऱ्याची बॅट घेऊन ही खास खेळी करुन दाखवली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर

T20I World Record : 'लिंबू टिंबू' संघाच्या कॅप्टनने मोडला हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

 उत्तुंग षटकारांची आतषबाजी

सलामीवीर क्विंटन डी कॉकने या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारत अवघ्या ४९ चेंडूत ११५ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १० षटकार ठोकले. डी कॉकच्या या धडाकेबाज खेळीमुळे दक्षिण अफ्रिकेच्या संघाने टी-२० इतिहासात धावांचा पाठलाग करताना दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. याच मैदानावर वेस्टइंडीजविरुद्धच दक्षिण आफ्रिकेनं २५९ धावांचा यशस्वी पाठलाग केल्याचा रेकॉर्ड आहे.

ब्रेविसची बॅट ठरली लकी

विशेष म्हणजे डी कॉकनं ही ऐतिहासिक खेळी उधारीच्या बॅटनं केली. सामन्यानंतर खुद्द क्विंटन डी कॉकने यासंदर्भातील गोष्ट शेअर केली. तो म्हणाला की, सामन्याआधी  माझ्याकडून मोठी चूक झाली. मी माझ्या काही बॅट्स घरीच ठेवून आलो होतो. ब्रेविसची बॅट घेऊन खेळलो. 

रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीत १० षटकार ठोकत क्विंटन डी कॉकने रोहित शर्माच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात १० षटकार मारणारा तो २७ वा फलंदाज ठरला. या यादीत रोहित शर्मासह संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचाही समावेश आहे.

Web Title : उधार की बैट, शतकीय अंदाज़: डी कॉक ने रोहित शर्मा के रिकॉर्ड की बराबरी की

Web Summary : क्विंटन डी कॉक ने वेस्ट इंडीज के खिलाफ साथी खिलाड़ी के बल्ले से विस्फोटक शतक बनाया और दक्षिण अफ्रीका को जीत दिलाई। उनकी पारी में 10 छक्के शामिल थे, जो रोहित शर्मा के एक पारी में सर्वाधिक छक्कों के रिकॉर्ड के बराबर है।

Web Title : Borrowed Bat, Century Swagger: De Kock Equals Rohit Sharma's Record

Web Summary : Quinton de Kock's explosive century against West Indies, achieved with a teammate's bat, powered South Africa to victory. His innings, featuring 10 sixes, matched Rohit Sharma's record for most sixes in an innings, marking a memorable feat.