Join us

PSL: पहिला थांबतो मग...! पाकिस्तानी गोलंदाजाची भन्नाट ॲक्शन; चाहत्यांनी घेतला आक्षेप

Usman Tariq PSL: पाकिस्तान सुपर लीग विविध कारणांमुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 14:37 IST

Open in App

Usman Tariq Bowling: पाकिस्तान सुपर लीग विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेली पाकिस्तान सुपर लीग शेजारील देशात लोकप्रिय आहे. या स्पर्धेतील यंदाच्या पर्वात पाकिस्तानच्या नवनिर्वाचित गोलंदाजाने पहिल्याच दोन षटकात २ बळी घेण्याची किमया साधली. पण, त्याने आपल्या विचित्र ॲक्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खरं तर उस्मान तारिक क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. कराची किंग्जविरूद्धच्या सामन्यात उस्मानने अप्रतिम गोलंदाजी केली. कराची किंग्जविरुद्ध त्याने प्रथम टीम सेफर्ट आणि नंतर जेम्स विन्सला बाद केले. दोन्ही सेट फलंदाजांना बाद केल्यामुळे उस्मान अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. या सामन्याचा निकाला अखेरच्या षटकात बदलला. 

दरम्यान, उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या क्शनवर चाहत्यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या स्थिर पावलांनी पुढे सरकणारा उस्मान तारिक चेंडू टाकण्यापूर्वी थोडा वेळ थांबतो. त्यामुळे गोलंदाज म्हणून तो नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसते. यामुळे उस्मानला फलंदाजाच्या हालचाली ओळखण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, त्यानुसार तो त्याची लाईन आणि लेन्थ सेट करतो आणि नंतर चेंडू टाकतो.

उस्मानने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर टिम सेफर्टला (११ चेंडूत २१ धावा) एलबीडब्ल्यू बाद करून पाकिस्तान सुपर लीगमध्ये आपला पहिला बळी पटकावला. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेम्स विन्स (२५ चेंडूत ३७ धावा) देखील याच पद्धतीने चीतपट झाला. दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवण्याची क्षमता देखील उस्मान तारिकमध्ये आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्सने तारिकला श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाच्या जागी करारबद्ध केले आहे.

उस्मान तारिकने रविवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुल्तान सुलतान्सविरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून पदार्पण केले. या सामन्यात खूप धावा झाल्या असल्या तरी तारिकने त्याच्या चार षटकात केवळ २७ धावा दिल्या होत्या.

चाहत्यांनी गोलंदाजीवर घेतला आक्षेप 

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेट