Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलासाठी 'स्पेशल' गिफ्ट!

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची मॉडल नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:32 IST

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. लंडनमधून शस्त्रक्रीया करून परतल्यानंतर पांड्या मायदेशात व्यायामाला लागला आहे. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तो आतुर आहे. त्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा व्हिडीओ पांड्यानं सोशल मीडियावर शेअर केला. तो अधिक काळ सोशल मीडियावरच सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात त्याच्या आणि मॉडल नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्याच्या चर्चाही रंगत आहेत. पण, आता त्याच्या लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट येऊ शकतो. त्यानं बॉलिवूड अभिनेत्री उर्वसी रौटेलाला एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यांना बळ देणारा प्रसंग मुंबईत पाहायला मिळाला. हार्दिक आणि नताशा हे दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डीनर घेऊन बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या नात्याला आणखी बळ देणारा प्रसंग पुन्हा घडला. हार्दिकनं चक्क नताशाला त्याच्या गाडीत लिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. पण, त्यानं सोमवारी उर्वशीला गिफ्ट दिली.

नताशापूर्वी हार्दिकचं नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौटेलाशी जोडले गेले आहे. त्यात पुन्हा हार्दिकच्या या कृतीनं नवा ट्विस्ट आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिकनं उर्वशीला एक पप्पी ( कुत्र्याचं पिल्लू) गिफ्ट दिलं. उर्वशीची भूमिका असलेल्या पागलपंती या नव्या चित्रपटासाठी अभिनंदन करताना हार्दिकनं ही भेट दिली.

टॅग्स :हार्दिक पांड्याउर्वशी रौतेला