Join us

आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार

दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळत दोन सामने जिंकले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 05:39 IST

Open in App

मुल्लापूर : येथील महाराज यादवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी होत असलेल्या लढतीत पंजाब व हैदराबाद संघ विजयासाठी उत्सुक असतील. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळत दोन सामने जिंकले आहेत.

सामना : सायंकाळी ७.३० पासून

हैदराबाद संघn फलंदाजीत प्रभावी कामगिरी झाली. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन आणि ऐडन मार्रक्रम यांनी संघाला भक्कम सुरुवात करून दिली.n जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर हे मोठ्या धावा मोजतात. नटराजनला केवळ चार तर कर्णधार पॅट कमिन्सला पाच बळी मिळाले. 

 पंजाब संघn कर्णधार शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियॉम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरनसिंग आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा यांच्याकडून धावांची अपेक्षा आहे. n गोलंदाजी मात्र चिंतेचा विषय. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज फ्लॉप झाले. अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, राहुल चाहर  महागडे ठरले. हरप्रीत ब्रारने चांगली कामगिरी केली.

टॅग्स :आयपीएल २०२४किंग्स इलेव्हन पंजाब