आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार

दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळत दोन सामने जिंकले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:39 AM2024-04-09T05:39:30+5:302024-04-09T05:39:41+5:30

whatsapp join usJoin us
Punjab-Hyderabad team will play for supremacy | आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार

आमने-सामने : पंजाब-हैदराबाद संघ वर्चस्वासाठी खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुल्लापूर : येथील महाराज यादवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी होत असलेल्या लढतीत पंजाब व हैदराबाद संघ विजयासाठी उत्सुक असतील. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळत दोन सामने जिंकले आहेत.

सामना : सायंकाळी ७.३० पासून

हैदराबाद संघ
n फलंदाजीत प्रभावी कामगिरी झाली. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन आणि ऐडन मार्रक्रम यांनी संघाला भक्कम सुरुवात करून दिली.
n जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर हे मोठ्या धावा मोजतात. नटराजनला केवळ चार तर कर्णधार पॅट कमिन्सला पाच बळी मिळाले. 

 पंजाब संघ
n कर्णधार शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियॉम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरनसिंग आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा यांच्याकडून धावांची अपेक्षा आहे. 
n गोलंदाजी मात्र चिंतेचा विषय. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज फ्लॉप झाले. अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, राहुल चाहर  महागडे ठरले. हरप्रीत ब्रारने चांगली कामगिरी केली.

Web Title: Punjab-Hyderabad team will play for supremacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.