Join us

Pulwama attack : गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 09:01 IST

Open in App

दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतली आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीत संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला जशासतसे उत्तर देण्याचा आग्रह भारतीय धरू लागले. आता चर्चा नाही, तर युद्धच हवं, अशी सर्वांची तीव्र भावना आहे. गंभीरही त्याला अपवाद नाही. त्याने तर भाजपा सरकारने पाकिस्तानशी चर्चा करू नका, त्यांना त्यांच्या भाषेतच समजवा, अशी मागणी केली. गंभीरच्या या तीव्र नाराजीवर पाकिस्तानचा फलंदाज शाहिद आफ्रिदीला विचारण्यात आले. 

गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " यापूर्वी पाकिस्तानशी चर्चा होत होती. पण चर्चा करण्याची ही वेळ नक्कीच नाही. आता चर्चा करण्यापेक्षा काही तरी करण्याची वेळ आली आहे. आता चर्चा टेबलवर नाही तर आता भेट थेट युद्धाच्या रणांगणात व्हायला हवी." 

गंभीरच्या या ट्विटबद्दल आफ्रिदीला विचारणा करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये आफ्रिदी मुल्तान सुलतान संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यावेळी एका पत्रकाराने आफ्रिदीला गंभीरच्या ट्विटबाबत विचारणा केली. त्यावर आफ्रिदीने जणू काही माहितच नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि तेथून पळ काढला. तो म्हणाला,"क्या हो गया उसको? ( त्याला काय झाले?)"

पाहा व्हिडिओ...जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदतया शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल. "

शहिद कुटुंबियांच्या मदतीसाठी विदर्भाकडून इनामाची रक्कमसलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकण्याचा मान विदर्भाच्या संघाने पटकावला आहे. विदर्भाचा संघ फक्त इतक्यावरच थांबला नाही, तर या विजयानंतर मिळालेली इनामाची रक्कम त्यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद  जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. गुरवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यामध्ये भारताच्या ४० जवानांना शहीद व्हावे लागले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करायचे विदर्भाच्या संघाने ठरवले आहे. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लागौतम गंभीरशाहिद अफ्रिदी