Join us  

पुजारा, रहाणे यांची हकालपट्टी होणार; दिग्गजांची रिप्लेसमेंट ठरली, 'ही' तीन नावं चर्चेत

पंजाबचा प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल मधल्याफळीत दमदार फलंदाज म्हणून खेळणार आहे. दुसऱ्या स्थानासाठी मात्र हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांच्यात चुरस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 5:45 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. कसोटी मालिकेत कमालीचे फ्लॉप ठरलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची हकालपट्टी निश्चित आहे. दुसरीकडे पंजाबचा प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल मधल्याफळीत दमदार फलंदाज म्हणून खेळणार आहे. दुसऱ्या स्थानासाठी मात्र हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांच्यात चुरस आहे. द. आफ्रिकेकडून १-२ ने झालेल्या मालिका पराभवानंतर हे बदल होतील. भारताला श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची पुढील कसोटी मालिका २५ फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे खेळायची आहे.  यासाठी मधल्या फळीत किमान दोन खेळाडूंची वर्णी लागेल. रोहित शर्मा या मालिकेआधी फिट होण्याची शक्यता आहे. तो बरा झाल्यास लोकेश राहुलसोबत डावाला प्रारंभ करेल.  गिल स्वाभाविकपणे सलामीला खेळतो. मात्र, संघ व्यवस्थापन त्याला मधल्या फळीत संधी देण्याच्या विचारात आहे.माझ्या मते श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी पुजारा आणि रहाणे यांना वगळायला हवे. श्रेयस आणि हनुमा विहारी यांना संधी मिळावी. तिसऱ्या स्थानावर कोण खेळेल हे पाहणे रंजक ठरेल. हनुमा हा पुजाराचे स्थान घेऊ शकतो. श्रेयस हा रहाणेच्या जागी पाचव्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. श्रीलंकेविरुद्ध रहाणे आणि पुजारा यांची संघाला गरज नाही.- सुनील गावसकर

टॅग्स :चेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेश्रेयस अय्यरशुभमन गिल
Open in App