पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये गुरुवारी (२ एप्रिल २०२६) झालेल्या सामन्यात धक्कादायक प्रकार घडला. कराची किंग्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याचाच सहकारी खेळाडू मोईन अली यांच्यात भरमैदानावर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकाच संघातील दोन दिग्गज खेळाडू अशा प्रकारे आपसात भिडल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
नेमकं काय घडलं?
रावलपिंडीजला पराभूत करून कराची किंग्सने आपली विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र, विजयानंतर खेळाडू मैदानातून बाहेर जात असताना वॉर्नर आणि मोईन अली यांच्यात तीव्र बाचाबाची झाली. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर प्रचंड संतापलेला दिसत आहे. तर, मोईन अली देखील त्याला काहीतरी बोलताना दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी संघातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करत दोघांना एकमेकांपासून दूर केले. दरम्यान, दोन अनुभवी खेळाडू यांच्यातील या वादामुळे संघाच्या वातावरणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कराची किंग्सची आतापर्यंतची कामगिरी
मैदानावरील या वादाव्यतिरिक्त कराची किंग्सची कामगिरी यंदाच्या हंगामात जबरदस्त राहिली आहे. या सामन्यात रावलपिंडीजने प्रथम फलंदाजी करत १९७ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. कराची किंग्सने हे लक्ष्य १९.२ षटकांत पूर्ण केले. यामध्ये आझम खानने ७४ धावांची तुफानी खेळी केली, तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या विजयासह कराची किंग्स ६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे.
Web Summary : Karachi Kings' Warner and Ali argued mid-game during PSL 2026, shocking fans. Despite the spat, Karachi won, with Azam Khan's 74 leading them to the top of the league.
Web Summary : पीएसएल 2026 में कराची किंग्स के वार्नर और अली के बीच खेल के दौरान बहस हुई, जिससे प्रशंसक हैरान रह गए। विवाद के बावजूद, कराची जीता, आजम खान के 74 रनों ने उन्हें लीग में शीर्ष पर पहुंचाया।