PSL 2026 Ball Tampering Controversy : पाकिस्तान सुपर लीग २०२६ च्या ११ व्या हंगामात ‘बॉल टेम्परिंग’च्या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला या प्रकरणात फक्त फखर झमान याचं नाव पुढे आलं होतं. मात्र आता या वादात शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांचाही समावेश झाल्याचं समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॉल टेम्परिंगचा वाद
पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामात लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यात स्पर्धेतील सहावा सामना खेळवण्यात आला. या सामन्याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात फखर झमान चेंडूसोबत छेडछाड करताना दिसत आहे. हा प्रकार शेवटच्या षटकापूर्वी घडला, ज्यावेळी कराची फ्रँचायझी संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती.
IPLशी स्पर्धा करायची स्वप्न बघत होता पाकिस्तान, आता PSLवर आली इतकी वाईट वेळ की...
नेमकं काय घडलं?
सामन्यातील अखेरचं षटक सुरु होण्यापूर्वी फखर जमानने चेंडू घेतला आणि तो हॅरिस रौफकडे दिला. यावेळी पंचांना संशय आल्याने त्यांनी चेंडू मागवला आणि चेंडूसोबत छेडछाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे लाहोर कलंदर्स संघावर ५ धावांची दंडात्मक कारवाई (पेनल्टी) केली. त्यामुळे कराची संघाला शेवटच्या षटकात फक्त ९ धावांची गरज होती. ३ चेंडू राखून त्यांनी हा सामना खिशात घातला. दुसरीकडे सामना गमावण्यासह लाहोर कलंदर्स संघातील तीन स्टार खेळाडू अडचणीत सापडले आहेत.
कामरान अकमलचं मोठं वक्तव्य
या प्रकरणावर बोलताना पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली यांनी म्हटलं आहे की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पुराव्यांनुसार फखर झमानवर कडक कारवाई होऊ शकते. दरम्यान, कामरान अकमल यानेही अधिक कठोर भूमिका घेतली. त्यांच्या मते, “फक्त फखर झमानच नव्हे, तर कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ हे देखील या बॉल टेम्परिंग प्रकरणात दोषी आहेत. त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.” आता या प्रकरणावर अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लो-स्कोरिंग सामना
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात १२८ धावा केल्या होत्या. कराचीच्या संघाने १९.३ षटकांत ४ गडी राखून सामना जिंकला. कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Web Summary : PSL 2026 faces ball-tampering controversy. Fakhhar Zaman is accused, with Shaheen Afridi and Haris Rauf implicated. Kamran Akmal suggests severe action against all three if found guilty during the match between Lahore Qalandars and Karachi Kings.
Web Summary : पीएसएल 2026 बॉल टैम्परिंग विवाद का सामना कर रहा है। फखर ज़मान पर आरोप है, शाहीन अफरीदी और हारिस रऊफ भी शामिल। कामरान अकमल ने लाहौर कलंदर्स और कराची किंग्स के मैच में दोषी पाए जाने पर तीनों के खिलाफ कड़ी कार्रवाई का सुझाव दिया।