पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून यंदाच्या हंगामातील पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) टी २० स्पर्धेला २६ मार्चपासून सुरुवात करणार आहे. यंदाच्या हंगामात ६ फ्रँचायझी संघांऐवजी ८ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण ४४ सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेला काही दिवस बाकी असताना पाकिस्तानमधील सध्याच्या घडीला निर्माण झालेल्या सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक खेळाडू PSL स्पर्धेतून माघार घेताना दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परदेशी खेळाडूंचा पाकिस्तानला जाण्यास नकार, कारण...
PSL मध्ये सहभागी आपल्या खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान फ्रँयायझी क्रिकेट स्पर्धेसाठी परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीतसंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इथं जाणून घेऊयात आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळायला नकार दिला त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'भारत आमचा खरा मित्र...' काबूल हल्ल्यानंतर MI च्या ताफ्यातील अफगाण स्टारची पाकिस्तानला चपराक
ब्लेसिंग मुझारबानी याने PSL सोडून धरला IPL चा रस्ता
झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी याने पाकिस्तानला ठेंगा दाखवत IPL स्पर्धेत खेळण्याला पसंती दिली. झिम्बाब्वेचा हा गोलंदाज PSL मधील इस्लामाबाद युनाएटेड संघाकडून करारबद्ध झाला होता. पण त्याने पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेत भारताचा रस्ता धरला. यंदाच्या हंगामात तो KKR च्या संघाकडून खेळताना दिसेल. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन (Spencer Johnson) हा याला क्वेटा ग्लॅडिएटर्स कडून खेळायचे होते, पण वैयक्तिक कारण देत त्याने आधीच नाव मागे घेतले.
हा क्रिकेटरही IPL च्या वाटेवर
वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोतीयानेही पीएसएलमधून माघार घेतली आहे. टी२० वर्ल्ड कप २०२६ नंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे तो गेल्या आठवड्यात भारतातून रवाना झाला होता. काही अहवालांनुसार तो आयपीएलच्या आगामी हंगामात खेळू शकतो.
हॅरी ब्रूकनं नाकारली ऑफर
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स आणि नामिबियाचा अष्टपैलू डेव्हिड व्हिसे यांनीही यापूर्वीच पीएसएलमधून माघार घेतली होती. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार हॅरी ब्रूकला लाहोल कलंदर संघाने आपल्याकडून खेळण्याची ऑफर दिली होती. त्यानेही या संघाकडून खेळण्यास नकार दिला आहे.
अफगाणिस्तानचे खेळाडूही दूर
यंदा पीएसएलमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फझल फारुखी आणि रमनुल्लाह गुरबाझ यांनी लिलावात नाव नोंदणी केल्यावर या लीगमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. गुरबाझला पेशावर झल्मीने थेट करारबद्ध केले होते, तरीही त्याने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.