Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tweet Controversy: पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं!

पाकिस्तानी संघाच्या ट्विटचा भारतीय वायुदलाशी संबंध, वाचा कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 11:11 IST

Open in App

पाकिस्तानमध्ये सध्या PSL (पाकिस्तान सुपर लीग) चा हंगाम सुरू आहे. गतविजेते लीग चॅम्पियन लाहोर कलंदर्स यांना यावेळीही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. शाहीन आफ्रिदीची ही टीम मैदानावर चांगला खेळ दर्शवित आहे, परंतु मैदानाच्या बाहेरील त्याच्या खराब कृत्याने भारतीय चाहत्यांचा पारा वाढविला आहे. भारताच्या हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दलच्या निकृष्ट ट्विटनंतर सोशल मीडियावर एक नवीन लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.

लाहोर कलंदर्सने आपला खेळाडू हुसेन तलत याचे एक चित्र शेअर केले, ज्यामध्ये हातात एक कप दिसला. कलंदर्स टीमने या चित्रासाठी एक विवादित मथळा लिहिला. त्यांनी लिहिले, 'ये तो टी इज फँटास्टिक वाली बात हो गई.' त्या ट्विट नंतर चाहत्यांनी या संघाला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

काय आहे कनेक्शन?

पाकिस्तानी चाहते अनेकदा भारताला लक्ष्य करण्यासाठी 'टी इज फँटास्टिक' हे वाक्य वापरतात. यामागचे कारण म्हणजे भारताचे हवाई दलाचे अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने तुरूंगात टाकले. अभिनंदन पाकिस्तानी कैदेत होते तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये अभिनंदनला चहा कसा आहे असे विचारले जाते. प्रत्युत्तरादाखल अभिनंदन म्हणतो, 'टी इज फँटास्टिक'. तेव्हापासून, पाकिस्तानी चाहत्यांनी याचा उपयोग भारताला ट्रोल करण्यासाठी केला.

भारतीय चाहत्यांचं सडेतोड उत्तर

लाहोर कलंदर्स यांना या कृतीचा त्रास सहन करावा लागला. या ट्विटने भारतीय चाहत्यांचा पारा खूप वाढविला आणि ट्विटरवर एक नवीन लढाई सुरू झाली. भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानच्या कंगालीची आठवण करून दिली. ट्विटला उत्तर देताना एका चाहत्याने लिहिले, "चहा देखील येथे कर्ज काढून घ्यावा लागतो." तर दुसऱ्याने पाकिस्तानला त्यांच्या भारताविरूद्धच्या कारगिल पराभवाची आठवण करून दिली.

--

टॅग्स :पाकिस्तानभारतीय हवाई दलअभिनंदन वर्धमानभारत
Open in App