Join us

PSL 2022 Sohail Tanvir : पाकिस्तानी खेळाडूकडून क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य, Ben Cuttingचं सडेतोड उत्तर, Video 

PSL 2022: Ben Cutting, Sohail Tanvir : पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य घडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 17:46 IST

Open in App

PSL 2022: Ben Cutting, Sohail Tanvir : पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्रिकेटची प्रतिमा मलिन करणारे कृत्य घडले. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज सोहैल तन्वीर आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज बेन कटिंग यांच्यात जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. या दोघांनी एकमेकांना अभद्र इशारे ( मधलं बोट दाखवून) केलेले पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोहैल तन्वीरने २०१८मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये असे गैरवर्तवणुक केली होती आणि त्याही वेळेस समोर बेन कटिंगच होता. कटिंगने त्याचे उत्तर आज दिले. 

२०१८मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये तन्वीरने कटिंगला मधले बोट दाखवले होते आणि त्यानंतर त्याला शिक्षाही सुनावण्यात आली होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये पुन्हा तिच चूक त्याने केली. कटिंगचा झेल पकडल्यानंतर तन्वीरने पुन्हा तिच कृती केली. पण, यावेळेस सुरूवात ही कटिंगकडून झाली होती. पेशावर झाल्मी संघाकडून खेळणाऱ्या कटिंगने आधी मधले बोट दाखवले. तन्वीर क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळतो.       याआधी पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याने गळा कापण्याचं सेलिब्रेशन केलं होतं आणि त्यावरून वादही झाला होता.,    

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App