भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं शनिवारी भरभरून कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे विराट-अनुष्काला सर्वाधिक काळ एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळत आहे. शनिवारी या दोघांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कोहलीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली, त्यात त्यानं अनुष्काचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं आहे. पण, असं नेमकं घडलं तरी काय?
निधी गोळा करण्यासाठी शोएब अख्तरनं घेतली 'शाहरुख खान'च्या नावाची अशी मदत!
शाहिद आफ्रिदीनं पुन्हा उपस्थित केला काश्मीर मुद्दा; भारतीयांनी घेतली शाळा
अनुष्का आणि विराट एकमेकांचं नेहमीच कौतुक करत आले आहेत. विराटनं अनेकदा जाहीरपणे अनुष्काच्या कामाची तारीफ केली आहे. त्यात अनुष्का निर्माता असलेल्या 'Paatal Lok' या क्राईम थ्रिलर वेबसीरिजचं कोहलीनं शनिवारी कौतुक केलं. Paatal Lok या वेब सीरिजची अनुष्का निर्माती आहे आणि त्यामुळे ती रिलीज होण्यापूर्वीच बघण्याची संधी विराटला मिळाली.
त्यानंतर विराटनं लिहिलं की,''पाताल लोकचं सर्व भाग पाहिले. ही अप्रतिम कथा पडद्यावर उतरवण्यासाठी सर्वांनी भरपूर मेहनत घेतली आहे. आता ती लोकांना किती आवडते याची उत्सुकता आहे. अनुष्काचा मला अभिमान वाटतो, की अशा दमदार सीरिजची ती निर्माती आहे.''
अवघ्या काही तासांत विराटच्या या पोस्टला दोन लाखांपर्यंत लाईक्स मिळाले. त्यात अनुष्काच्या लाईक्सचाही समावेश आहे. अऩुष्कानं काही दिवसांपूर्वी पाताल लोक पाहत असल्याचा फोटो पोस्ट केला होता. या सीरिजमध्ये नीरज काबी, जयदीप अहलावत, गुल पनाग, स्वस्तिका मुखर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी अभिनय केला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पाकमधील हिंदूंना अन्न वाटप करणारा शाहिद आफ्रिदी बांगलादेशच्या मदतीला धावला
Video : म्युझिक व्हिडीओसाठी लिओनेल मेस्सीचे पत्नीसोबत लिपलॉप; नेटिझन्सकडून ट्रोल
पतीच्या आठवणीनं सानिया मिर्झा भावुक; म्हणाली, इझान आपल्या बाबांना कधी भेटेल माहीत नाही!
Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?
Good News : टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यास BCCI तयार, पण...
टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागणार, पण विराट अन् रोहित यांना घरीच रहावे लागणार!