रणजी स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सराव सामन्यात पृथ्वी शॉनं हिट शो दाखवला. महाराष्ट्र संघाकडून आपल्या जुन्या संघाविरुद्ध अर्थात मुंबई संघाविरुद्ध त्याने जबरदस्त खेळी केली. त्याने या सामन्यात २२२ चेंडूत १८१ धावा कुटल्या. टी-२० स्ट्राइलमध्ये फटकेबाजी करत तो तो द्विशतकी डाव साधणार असे वाटत असताना मुशीर खानने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि मुशीर खान दोघांच्यात वाद झाला. मैदानातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भर मैदानात पृथ्वी शॉ -मुशीर खान यांच्यात वाजलं? प्रकरण सोशल मीडियावर गाजलं
मुशीर खानच्या गोलंदाजीवर स्विप मारण्याचा प्रयत्न फसला आणि पृथ्वी शॉनं १८१ धावांवर झेलबादच्या रुपात आपली विकेट गमावली. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना अचानक काहीतरी घडलं आणि पृथ्वी मुशीर खानच्या दिशेनं आला. दोघांच्यात शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान रागाच्या भरात पृथ्वीनं मुशीर खानवर बॅटही उगारल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या ताफ्यातील खेळाडू आणि मैदानातील पंचांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले. मैदानात भांडण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पृथ्वी आणि मुशीर मुंबईकडून एकत्र खेळले आहेत. आता पूर्वी दोघांचे पटत नसल्यामुळे वाद रंगला की, मैदानात मुशीर खान काही बोलल्यामुळे पृथ्वी चिडला ते अजून तरी गुलदस्त्यातच आहे.
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
मुंबई विरुद्ध धमाका; पृथ्वीनं अर्शिनच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी केली त्रिशतकी भागीदारी, पण...
पृथ्वी शॉ याने मुंबई संघ सोडून महाराष्ट्र संघाच्या ताफ्यातून नव्या हंगामाची सुरुवात केली आहे. रणजी स्पर्धेसाछी दमदार तयारी केल्याचे दाखवून देताना त्याने मुंबईविरुद्ध कडक खेळी साकारली. १८१ धावांची खेळी करताना त्याने अर्शिन कुलकर्णीच्या साथीनं सलामीला ३०५ धावांची भागीदारी रचली. जुन्या संघाविरुद्ध बॅटिंगमधील त्याचा तोरा आगामी हंगामात मोठा धमाका करण्यास सज्ज असल्याचे संकेत देणारा होता. पण मुशीर विरुद्ध भांडणामुळे कुठंतर त्याच्या हिट शोला 'ग्रहण' लागण्यातला प्रकार घडला आहे.