Join us

Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी

आधी टीम इंडियातून आउट, मग मुंबई संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता, IPL मध्ये  अनसोल्ड राहिला, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:08 IST

Open in App

Prithvi Shaw Fity Maharashtra vs TNCA Buchi Babu Tournament : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉनं टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र संघाता हात धरलाय. तमिळनाडूतील बुची बाबू स्पर्धेतून पृथ्वीनं नव्या संघाकडून नव्या इनिंगला सुरुवात केली. महाराष्ट्राकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवल्यावर आता दुसऱ्या सामन्यातही त्याने लक्षवेधी खेळी केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

९६ चेंडूत ६६ धावांची खेळी

महाराष्ट्र आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हन यांच्यात रंगलेल्या सामन्यात पृथ्वी शॉनं ९६ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. याआधी छत्तीसगड विरुद्धच्या लढतीत त्याने पहिल्या डावात शतक ठोकले होते. पण दुसऱ्या डावात तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता. पण त्यानंतर पुन्हा दमदार कमबॅक करत त्याने पुन्हा मैदानात गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. 

टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!

 महाराष्ट्र संघाकडून पृथ्वीच टॉपर

TNCA इलेव्हन संघाने पहिल्या डावात ३८४ धावा केल्यावर महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात २२८ धावा केल्या. या डावात पृथ्वीनं ६६ धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या दिवसाअखेर पृथ्वी ५७ चेंडूत ४७ धावांवर खेळत होता. तिसऱ्या दिवशी अर्धशतक पूर्ण केल्यावर तो आणखी एक शतक झळकावेल, असे वाटत होते. पण ६६ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. त्याने केलेली खेळी महाराष्ट्र संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी राहिलीय. हा सामना अखेर अनिर्णत राहिला.

आधी टीम इंडियातून आउट, मग मुंबई संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता, IPL मध्ये  अनसोल्ड राहिला, आता...

कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टीम इंडियातून बाहेर पडल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो धमक दाखवण्यात कमी पडला. परिणामी मुंबई संघातून त्याचा पत्ता कट झाला. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. पण मेगा लिलावाआधी या संघाने त्याला रिलिज केले. एवढेच नाही तर त्यानंतर त्याच्यावर लिलावात अनसोल्ड राहण्याची वेळ आली. आता महाराष्ट्र संघाकडून दमदार पदार्पण केल्यावर आगामी IPL हंगामामध्ये एखादा संघ मिळेल, या तोऱ्यात तो बॅटिंग करताना दिसतोय चेन्नईच्या मैदानातून महाराष्ट्र संघाकडून कमबॅक केल्यावर IPL मधील CSK संघाच त्याच्यावर डाव खेळू शकतो, अशी चर्चाही आता रंगू लागलीये.

टॅग्स :पृथ्वी शॉबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्स