स्टंपच्या बदली मातीच्या विटा! दिल्लीत आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान चक्क 'गल्ली क्रिकेट' खेळण्यात रमले

अन् पंतप्रधान दिल्लीच्या रस्त्यावर लहान मुलांनी  मांडलेल्या गल्ली क्रिकेटच्या खेळात झाले सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:35 IST2025-03-19T12:29:06+5:302025-03-19T12:35:04+5:30

whatsapp join usJoin us
Prime Minister of New Zealand Christopher Luxon Shared Pictures of Him And Former New Zealand Cricketer Ross Taylor Playing Cricket With Children In Delhi | स्टंपच्या बदली मातीच्या विटा! दिल्लीत आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान चक्क 'गल्ली क्रिकेट' खेळण्यात रमले

स्टंपच्या बदली मातीच्या विटा! दिल्लीत आलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान चक्क 'गल्ली क्रिकेट' खेळण्यात रमले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लुक्सन (Christopher Luxon) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. १७ ते १९ मार्च या कालावधीत पार पडत असलेल्या रायसीना संवाद सत्राच्या कार्यक्रमातील ते प्रमुख पाहुणे आहेत. या दरम्यान त्यांनी एक खास फोटो शेअर करत सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर लहान मुलांनी  मांडलेल्या गल्ली क्रिकेटच्या खेळात सहभागी होऊन न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी या लोकप्रिय खेळाचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 स्टंप म्हणून मातीच्या विटा, डांबरी पिचवर चक्क न्यूझीलंड पंतप्रधानांनी केली बॅटिंग, अन्..

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन फोटो शेअर केले आहेत. यात ते लहान मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेताना दिसते. मातीच्या विटासह तयार केलेल्या स्टंप आणि रस्तावरील डांबरी पिचवर त्यांनी बच्चे कंपनीसोबत टेनिस बॉलवर रंगलेल्या  क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला.  क्रिकेटवरील अफाट प्रेम हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील समानतेचा एक धागाच आहे, अशा आशयाच्या कॅप्शनसह न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी हे फोटो शेअर केले आहेत.  

रोस टेलर खेळताना विकेट किपरच्या भूमिकेत दिसले पंतप्रधान

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी जो दुसरा फोटो शेअर केलाय त्यात न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर रोस टेलरची झलक पाहायला मिळते. हा दिग्गज बॅटिंगला आल्यावर क्रिस्टोफर लुक्सन मातीच्या विकेटमागे (स्टंप) क्षेत्ररक्षण करताना दिसले. सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.  

मोदींनी क्रिकेटसह अन् हॉकीचा दिला होता दाखला

भारत दौऱ्यावर असलेल्या क्रिस्टोफर लुक्सन यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील क्रिकेट आणि हॉकी या खेळाचा दाखला दिल्याचे पाहायला मिळाले होते. या दोन खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांत जुने नातं आहे. खेळामुळे द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट होण्यास मदत झाली आहे. 

Web Title: Prime Minister of New Zealand Christopher Luxon Shared Pictures of Him And Former New Zealand Cricketer Ross Taylor Playing Cricket With Children In Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.