Prime Minister Narendra Modi Personally Serves Food To Wheelchair Bound Pratika Rawal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी महिला वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा खास सन्मान केला. जग जिंकणाऱ्या भारताच्या लेकींच्या कौतुक सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संघातील प्रत्येक खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रतीका रावल संघासोबत व्हीलचेअरवरुनच पंतप्रधानांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रतीकानं PM मोदींसोबत शेअर केली खास गोष्ट
प्रतीका ही नॉकआउट्स विरुद्धच्या लढतीआधीच दुखापत झाल्यामुळे संघाबाहेर पडली होती. टेन्क्निकली ती संघाचा भाग नव्हती. पण भारतीय संघाने विश्वविजेतेपद जिंकल्यावर ती पोडियमवरही व्हिलचेअरवर बसून सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या ग्रेट भेटीत तिने वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानचा खास अनुभवही शेअर केला. दुखापतग्रस्त झाल्यावर संघातील सर्वजणींनी माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकायचं ठरवलं, होतं ही गोष्ट तिने मोदींसोबतच्या संवादात शेअर केली.
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदीजींनी स्वत: आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ, चर्चा तर होणारच
विश्वविजेत्या महिला संघाच्या मानपानानंतरच्या खानपानावेळीचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीका रावल हिच्याकडे जाताना दिसतात. दुखापतीमुळे ती बुफे सेटकडे जाऊन स्वतः खाद्यपदार्थ घेऊ शकत नसल्याने, पंतप्रधान तिच्याकडे “तुला काय आवडतं?” असं विचारतात. एवढंच नव्हे, तर ते स्वतः बुफे सेटकडे जाऊन प्रतीकासाठी तिच्या आवडीचा पदार्थ घेतात आणि तो तिला देतात. पीएम मोदींची ही कृती मन जिंकणारी ठरत आहे.