Pradeep Mehra running video: 'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम!

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ Mumbai Indians सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते. त्यामुळेच सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये मुंबई इंडियन्स टॉपर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:36 PM2022-03-22T14:36:02+5:302022-03-22T14:38:38+5:30

whatsapp join usJoin us
Pradeep Mehra running video: Aapne humara dil jeet liya Pradeep, Mumbai Indians Share inspirational Video | Pradeep Mehra running video: 'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम!

Pradeep Mehra running video: 'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ Mumbai Indians सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते. त्यामुळेच सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये मुंबई इंडियन्स टॉपर आहे. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. प्रदीप मेहरा याचा ( Pradeep Mehra running video) हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच्या धावण्यामागच्या कथेनं सर्वांना प्रेरीत केले आहे.  रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो. व्हायरल व्हिडीओमधील तरुणाचा संवाद अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मग, अशात मुंबई इंडियन्स या मुलाचं कौतुक करण्यास मागे कशी राहील? त्यांनीही एक ट्विट केले आहे. 

लष्करात जाण्यासाठी तयारी 
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात आहे.  मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर तो घरी जात आहे. तो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी आहे आणि त्याच्या आईवर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लष्करात जाण्यासाठी धावण्याचा सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जातो. त्यामुळे  कार चालकाने लिफ्टची ऑफर देऊनही त्याने सवय मोडेल म्हणून ती नाकारली.

मुंबई इंडियन्सचं ट्विट..
आपने हमारा दिल जीत लिया प्रदीप!, आज तर तुम्ही कोणता व्हिडीओ पाहायचं ठरवले असाल तर हा पाहा पलटन!, असे MI ने ट्विट केले आहे. 

Web Title: Pradeep Mehra running video: Aapne humara dil jeet liya Pradeep, Mumbai Indians Share inspirational Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.