Join us
Daily Top 2Weekly Top 5

'विरुष्का'च्या दिल्लीतील ग्रँड रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती!

नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. यावेळी रिसेप्शन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 23:47 IST

Open in App
ठळक मुद्दे'विरुष्का'च्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी लावली हजेरी दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार

नवी दिल्ली : नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडीचा दिल्लीतील रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटामाटात गुरुवारी पार पडला. यावेळी रिसेप्शन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. गेल्या 11 डिसेंबर रोजी विराट आणि अनुष्काचं इटलीमध्ये लग्न झाले. हा लग्नसोहळा काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. या लग्नानंतर विराट आणि अनुष्कानं आपल्या मित्र परिवारांसाठी नवी दिल्लीत आज रिसेप्शन सोहळा आयोजित केला होता. दिल्लीतील ताज डिप्लोमॅटिक अॅनक्लेवच्या दरबार हॉलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. विराट हा मुळचा दिल्लीचा असल्यामुळे त्याच्या या सोहळ्यात मित्रमंडळींनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. तसेच, विराट आणि अनुष्काच्या कुटुंबातले सर्व नातेवाईकही हजर होते. या रिसेप्शन सोहळ्यादरम्यान विराट आणि अनुष्काने पारंपरिक पोशाख केला होता. विराटने ब्लॅक शेरवानी घातली होती, तर अनुष्काने लाल रंगाची जरीकाम केलेली साडी परिधान केली होती. 

आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या रिसेप्शनला बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज हजर राहण्याची शक्यता आहे. हा सोहळा मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत.

 

टॅग्स :विराट कोहलीविरूष्काविरूष्का वेडिंगनरेंद्र मोदी