Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, प्रकृतीबाबत केली विचारणा!

भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly)  याला शनिवारी सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 4, 2021 09:44 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly)  याला शनिवारी सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत सौरव गांगुलीला  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते. गांगुलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,  प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनीही रविवारी गांगुलीला फोन केला आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. गांगुली राजकारणात येणार अशी चर्चा असताना त्याच्यावर हा आघात झाला. गांगुली भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असाही तर्क लावला जात आहे. गांगुलींनं मात्र राजकारणात प्रवेशाचे अद्याप संकेत दिलेले नाहीत. काही दिवसांआधी त्यानं बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट होती, असे नंतर खुद्द गांगुलीनेच स्पष्ट केले होते. 

PTIनं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी यांनी गांगुली व त्याची पत्नी डोना यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी गांगुलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली.  

टॅग्स :सौरभ गांगुलीनरेंद्र मोदी