Join us  

CoronaVirus : सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय... 

रैनानं पंतप्रधान सहाय्यता निधी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनुक्रमे 31 व 21 लाखांची अशी एकूण 52 लाखांची मदत केली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 12:16 PM

Open in App

भारताचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैनानं शनिवारी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, युसूफ व इरफान पठाण आणि गौतम गंभीर यांच्यानंतर कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी पुढे आलेला रैना हा आणखी एक क्रिकेटपटू आहे. त्याच्या या मदतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं. 

रैनानं नुकतीच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानं 2018मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला होता. आगामी आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्यात त्याचा निर्धार आहे.  रैनानं पंतप्रधान सहाय्यता निधी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनुक्रमे 31 व 21 लाखांची अशी एकूण 52 लाखांची मदत केली आहे.   त्यावर मोदींनी ट्विट केलं की,''हे अप्रतिम अर्धशतक आहे.''

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

 तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स 

मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासुरेश रैनानरेंद्र मोदी