Join us

बाबर आजम- मोहम्मद रिझवान यांची पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० संघातून हकालपट्टी? शाहिद आफ्रिदीने दिले संकेत 

पाकिस्तान क्रिकेट संघाचा हंगामी निवड समिती प्रमुख शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) आणखी एक मोठी घोषणा केली आहे. रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:53 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट संघाचा हंगामी निवड समिती प्रमुख शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय ट्वेंटी-२० संगात फक्त तेच खेळाडू निवडले जातील, ज्यांचा स्ट्राइक रेट १३५ किंवा त्याहून अधिक असेल असे आफ्रिदीने म्हटले आहे. देशांतर्गत ट्वेंटी-२० स्पर्धेत ज्यांचा स्ट्राईक रेट १३५ पेक्षा कमी आहे, अशा फलंदाजांसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडणार नाहीत, असे माजी कर्णधाराने म्हटले आहे. आफ्रिदीच्या घोषणेनंतर कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. या दोन्ही फलंदाजांचा ट्वेंटी-२० मध्ये स्ट्राइक रेट १३० पेक्षा कमी आहे.

PAK vs NZ Test : न्यूझीलंडच्या दहाव्या विकेटने पाकिस्तानला रडवले, त्यानंतर सहकाऱ्याने बाबर आजमला बाद केले 

आशिया चषक आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार बाबर आजम आणि उपकर्णधार मोहम्मद रिझवान यांच्या संथ फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बाबरने ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ओपनिंग करू नये, असे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. या दोघांच्या संथ खेळामुळे संघाला पॉवरप्लेचा फायदा घेता येत नाही. सुरुवातीला धावा काढता न आल्याने उर्वरित फलंदाजांवर दडपण येते, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान बाबरने मधल्या फळीत फलंदाजी करावी, असा सल्ला खुद्द शाहिद आफ्रिदीने दिला आहे. 

शान मसूद, फखर जमान किंवा मोहम्मद हरीस यांसारख्या आक्रमक फलंदाजांसाठी बाबरने सलामीची जागा सोडली पाहिजे, असेही आफ्रिदी म्हणाला होता. समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की,''आम्हाला अधिकाधिक तरुणांना संघात स्थान द्यायचे आहे.'' तथापि, १३५ च्या स्ट्राइक रेटचा नियम कोणत्या खेळाडूंवर लागू होईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही. सर्व खेळाडू या कक्षेत येतील की फक्त नवीन खेळाडू?टीम इंडियाप्रमाणे पाकिस्तानला मजबूत बनवायचे आहेआयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमुळे टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे. एका वेळी भारताचे दोन संघ मैदानात उतरू शकतात. आता पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदीही तोच प्रयत्न करत आहे. आफ्रिदी म्हणाला की, मला माझा कार्यकाळ संपण्यापूर्वी पाकिस्तानसाठी दोन संघ बनवायचे आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला आपली बेंच स्ट्रेंथ मजबूत करावी लागेल. त्यासाठी तरुणांना संघाशी जोडावे लागेल. आतापर्यंत पीसीबीमध्ये संवादाचा खूप अभाव होता. आता मी राष्ट्रीय संघातील प्रत्येक खेळाडूशी वैयक्तिकरित्या बोलत आहे. यासोबतच मी युवा खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवून आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :शाहिद अफ्रिदीबाबर आजमपाकिस्तान
Open in App