Join us  

महिला डॉक्टरच्या बलात्कारनंतर हत्या झाल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी व्यक्त केला राग, पाहा कोण काय म्हणाले...

जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी आपला राग व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:27 PM

Open in App

मुंबई : हैदराबादमध्ये  या 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी आपला राग व्यक्त केला आहे.

 सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पीडित तरुणीने आराडाओरडा केला असता तिचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. या घटनेनंतर भारताच्या खेळाडूंनी आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक मुलगी आणि श्वान पाठमोरे बसलेले आहेत. या फोटोवर गंभीरने लिहिले आहे की, " नेमकी जनावरं आहेत तरी कोण, हे देवाकडे तू चेक कर." 

हैदराबादमध्ये पीडित या २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवरबलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत प्रियांकावर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी पीडितीला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समजतंय. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानेही लक्ष घातले असून संबंधित अधिकाऱ्यांना हैदराबादला पाठविण्यात आलंय. 

पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले,तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.

दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची ६ वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितीच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितीचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. मात्र, मधल्या काळात नेमकं काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :गौतम गंभीरहरभजन सिंगसायना नेहवाल