Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्रसिंग धोनीसारखे लांबसडक केस ठेवणाऱ्या ' त्या ' खेळाडूचा सोशल मीडियावर हंगामा

आशियाई क्रीडा स्पर्धेत तो खेळायला आला. तेव्हा त्याच्या केसांची भूरळ साऱ्यांनाच पडली आणि आठवण आली ती महेंद्रसिंग धोनीची.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:55 IST

Open in App
ठळक मुद्देधोनीसारखेच त्याचे लांब  केस चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत तो खेळायला आला. तेव्हा त्याच्या केसांची भूरळ साऱ्यांनाच पडली आणि आठवण आली ती महेंद्रसिंग धोनीची. धोनीसारखेच त्याचे लांब  केस चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी सुरु असताना बऱ्याच जणांनी नीरजच्या केसांची स्तुती केली.

काही जणांना तर धोनीचा हा भाऊ तर नाही ना, असाही प्रश्न पडला.

नीरजने सर्वाधिक 88.06 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले.

नीरज सुरुवातीला क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळत होता. पण 2011 साली त्याने भालाफेक हा खेळ खेळायला सुरुवात केली.

टॅग्स :नीरज चोप्राआशियाई क्रीडा स्पर्धामहेंद्रसिंह धोनी