Join us  

'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना एक महत्वाचा संदेश दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:30 AM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना एक महत्वाचा संदेश दिला आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी वेळ वाया घालवणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना शिस्तीच्या दृष्टीने राज्य (रणजी) संघांमध्ये सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे हे खेळाडू रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत खेळताना दिसणार आहेत. अलीकडे अनेक खेळाडूंनी असे सांगूनही एक प्रकारे रणजी क्रिकेटवर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत होते.

बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने आता याबाबत कठोर निर्णय घेतला आहे. सोमवारी ईमेलद्वारे अनेक खेळाडूंना कळवण्यात आलेला हा निर्देश सध्या राष्ट्रीय संघाचा भाग नसलेल्या किंवा बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन करत असलेल्यांना लागू होतो. या खेळाडूंना १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यांच्या आगामी फेरीसाठी आपापल्या राज्यांच्या संघात तात्काळ प्रभावाने सामील होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'खेळाडू केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएललाच प्राधान्य देऊ शकत नाहीत, त्यांना देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवावे लागेल आणि त्यांच्या संबंधित राज्य संघांसोबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करावा लागेल.

इशान किशनला कठोर संदेश-

आयपीएलच्या तयारीसाठी स्पर्धात्मक क्रिकेट सोडून इशान किशनसारख्या खेळाडूंवर या नियमाच्या अंमलबजावणीचा परिणाम होईल. क्रिकबझच्या अलीकडील अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अलीकडे तो आयपीएलसाठी बडोद्यात प्रशिक्षण घेत आहे, तर त्याचा घरचा संघ झारखंडला जमशेदपूरमध्ये राजस्थानविरुद्ध खेळायचे आहे. ईशान किशन गेल्या अनेक दिवसांपासून स्पर्धात्मक क्रिकेटमधून गायब आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील तणाव वाढला आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळण्यास नकार देण्याच्या त्याच्या निर्णयावर टीका झाली आहे. या टीकेनंतरही ईशान आयपीएलच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

कृणाल पांड्या, दीपक चहरही रणजी खेळत नाहीत-

मात्र, हा निर्णय पूर्णपणे इशानबाबत नाही. त्याची व्याप्ती क्रुणाल पांड्या आणि दीपक चहर यांसारख्या इतर खेळाडूंपर्यंत आहे, जे रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये निष्क्रिय राहिले आहेत. श्रेयस अय्यरही या कडक कारवाईत आहे. ज्याला खराब फॉर्ममुळे राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले होते.

टॅग्स :बीसीसीआयइशान किशनदीपक चहरभारतीय क्रिकेट संघ