Join us  

दादा की दिवानगी! सौरव गांगुलीचा 'हा' फोटो होतोय वायरल

एका सेल्फीमध्ये एवढ्या व्यक्ती कशा दिसत आहेत, हा प्रश्नदेखील चाहत्यांना पडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 3:33 PM

Open in App

मुंबई : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे भरपूर चाहते आहे. आता अध्यक्ष झाल्यानंतर गांगुली पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळे ही दादाची 'दिवानगी' पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा फोटो आता चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.

गांगुली जेव्हा खेळत होता तेव्हा त्याच्या चाहत्यांची अमाप संख्या होती. आता अध्यक्षपद स्वीकारल्यावर पुन्हा एका चाहते गांगुलीकडे आकृष्ठ झाले आहेत. त्यामुळे गांगुलीबरोबर फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी एवढ्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्यावर गांगुलीने एक तोडगा काढला आणि सर्वांबरोबर एक सेल्फी घेतला. हा फोटो गांगुलीने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला असून तो चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी गांगुली आपला माजी सहकारी आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडला भेटण्यासाठी बंगळुरुला गेला होता. त्यावेळी बंगळुरु विमानतळावर उतरल्यावर गांगुलीला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच रांग लागली. त्यानंतर गांगुलीने या सर्वांबरोबर एक सेल्फी काढला. एका सेल्फीमध्ये एवढ्या व्यक्ती कशा दिसत आहेत, हा प्रश्नदेखील चाहत्यांना पडला होता. पण गांगुलीने या फोटोमागील गोष्ट सांगितली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये जसे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे, तसेच गांगुलीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला बनवायचे आहे. त्यासाठी एक जागाही त्यांनी पाहिली आहे. अकादमीचे संचालकपद सध्या भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे आहे. पण रवी शास्त्री यांनीही या अकादमीमध्ये यावे आणि मार्गदर्शन करावे, असे गांगुलीला वाटत आहे.

याबाबत गांगुली म्हणाला की, " राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद द्रविडकडे आहे. या अकादमीमध्ये पारस म्हाम्ब्रेदेखील आहे. त्याचबरोबर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही येथे येतात. पण शास्त्री येत नाहीत. पण आता त्यांना येथे येऊन मार्गदर्शन करावे लागेल."

टॅग्स :सौरभ गांगुलीराहूल द्रविडबीसीसीआय