Join us

या फोटोत आहेत टीम इंडियाचे दोन सुपरस्टार; बघा तुम्हाला ओळखता येतात का?

रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज वसीम जाफरनं सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 11:55 IST

Open in App

रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज वसीम जाफरनं सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 41 वर्षीय जाफर सध्या विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली विदर्भनं रणजी करंडक उंचावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबईकडून दुसऱ्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणाऱ्या जाफरच्या नेतृत्वाखाली मुंबईनं रणजी करंडकाची दोन जेतेपद नावावर केली. त्यानं भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना 31 कसोटी सामन्यांत 5 शतकं व 11 अर्धशतकांसह 1944 धावा केल्या. पण, त्याला टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची अधिक संधी मिळाली नाही. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र जाफरची बॅट चांगलीच तळपली. त्यानं 253 सामन्यांत 51.19च्या सरासरीनं 19147 धावा केल्या आहेत. त्यात 57 शतकं व 88 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्येही त्यानं 44.08च्या सरासरीनं 118 सामन्यांत 4849 धावा चोपल्या आहेत. सध्या जाफर विदर्भ संघाचा खेळाडू अन् मार्गदर्शक अशा दुहेरी भूमिकेत आहे. त्यानं सोशल मीडियावर 2006-07च्या इंडियन ऑईल संघाचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोत टीम इंडियाचे सध्याचे स्टार खेळाडू दिसत आहेत. पण, पहिल्या नजरेत त्यांना ओळखणं अनेकांना अवघड जाईल. बघा तुम्हाला जमतंय का?

यातील एक खेळाडू हा टीम इंडियाचा मधल्या फळीतील आधारस्तंभ आहे. त्याच्या नावावर 73 कसोटी सामन्यांत 49.39च्या सरासरीनं 5631 धावा आहेत. त्यात 18 शतकं व 22 अर्धशतकं आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 14 हजाराहून अधिक धावा आहेत. दुसरा खेळाडू हा सुपरस्टारच आहे. त्याच्या नावावर 30 कसोटी आहेत, पण त्यातही त्यानं 48.04च्या सरासरीनं 2114 धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये 218 सामन्यांत त्यानं 48.52च्या सरासरीनं 8686 धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20तर त्याच्या नाववर अधिक विक्रम आहेत. 99 सामन्यांत त्यानं 2452 धावा केल्या आहेत आणि त्यात चार शतकांचाही समावेश आहे.

बघा आता तरी ओळखता येतात का?

 

टॅग्स :रोहित शर्माचेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघ