Join us  

भारताच्या हर्लीन देओलनं टिपलेल्या अफलातून झेलची पंतप्रधान मोदींनीही घेतली दखल, म्हणाले...

ENG-W vs IND-W 1st T20,  : Harleen Deol : भारताच्या हर्लीन देओलनं इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टिपलेल्या अफलातून झेलची सध्या जोरदार चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 6:42 PM

Open in App

ENG-W vs IND-W 1st T20,  : Harleen Deol : भारताच्या हर्लीन देओलनं इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टिपलेल्या अफलातून झेलची सध्या जोरदार चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट विश्वात हर्लीनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं जात आहे. यात आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हर्लीनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाची आणि तिनं टिपलेल्या झेलची दखल घेतली असून तिचं कौतुक केलं आहे. 

जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक इन्स्टा स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका शब्दात हर्लीनच्या अफलातून झेलचं वर्णन केलं आहे. "अद्भूत" असं विशेषण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्लीननं सीमारेषेजवळ घडवलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अप्रतिम दर्शनाचं कौतुक केलं आहे. 

सीमारेषेबाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेप घेणं अन् चतुराईनं तो टिपून संघाला एक यश मिळवूण देणे, हे सर्वांनाच जमते असे नाही. पण, हर्लीननं ते करून दाखवलं.  शिखा पांडेच्या गोलंदाजीरवर भारतासाठी डोईजड झालेल्या अॅनी जोन्सनं सुरेख फटका मारला, पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या हर्लीननं तो चेंडू टिपला. तोल सीमारेषेबाहेर जात असल्याचे समजताच तिनं चेंडू पुन्हा हवेत फेकला अन् सीमारेषेबाहेरून हवेत झेप घेत पुन्हा तो झेलला. तिच्या या कॅचचं अनेकांनी कौतुक केलंच, शिवाय प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या खेळाडूंनी टाळ्या बाजवल्या. जोन्स २६ चेंडूंत ४३ धावांवर माघारी परतली.   

हर्लीन देओल पकडलेला कॅच एवढा अफलातून होता की आनंद महिंद्रांनाही बसला नाही विश्वास 

इंग्लंडच्या महिला संघानं २० षटकांत ७ बाद १७७ धावा केल्या. नॅट शिव्हर ( ५५), जोन्स ( ४३) व डॅनी वॅट ( ३१) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. भारताकडून शिखा पांडेनं २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतानं ८.४ षटकांत ३ बाद ५४ धावा केल्या होत्या आणि पावसामुळे खेळ रद्द करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला १८ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयनरेंद्र मोदी