Join us  

WiFi दुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटूच्या घरी थेट 'NASA'वरून आला व्यक्ती!

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 1:50 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. त्यामुळे देशात अजूनही नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. अशात भारताचा माजी क्रिकेटपटू अन् समालोचक संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनमधून त्यांची विनोदबुद्धी जाणवते.

मांजरेकर यांनी त्यांच्या घरातील WiFi दुरुस्त करण्यासाठी टेक्नीशीयनला बोलावले. PPE किट घालून आलेला टेक्नीशीयन पाहून मांजरेकर यांनी ट्विट केलं.  त्यांनी लिहिलं की,'' माझ्या घरातील WiFi दुरुस्तीसाठी थेट नासाहून टेक्नीशीयन आला.'' मांजरेकर यांनी 37 कसोटी आणि 74 वन डे सामन्यांत अनुक्रमे 2043 आणि 1994 धावा केल्या आहेत.  

विराट कोहलीवर लट्टू झालेल्या महिला क्रिकेटपटूनं केला साखरपुडा; बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवणारं तिचं सौंदर्य 

IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय क्रिकेट संघ