- सुनील गावसकर
एका संघाला सलग तीन ‘करा किंवा मरा’ सामने खेळावे लागण्याची ही पहिली वेळ असावी. भारतासाठी पाकविरुद्ध सामना नेहमी करा किंवा मरा असाच असतो. दोन्ही संघांमधील कडवटपणा खेळात दिसतो. पाकविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकणे आवश्यक होते.
भारताने सामना जिंकला असता तर, उपांत्य फेरीची संधी होती. गटातील अन्य संघ भारतासाठी धोकादायक नव्हते. पण न्यूझीलंडने अव्वल दर्जा दाखवून भारताला पराभवाची चव चाखायला लावली. आता अफगाणिस्तानविरुद्ध पुन्हा ‘करा किंवा मरा’ची स्थिती आली. अफगाणवरील विजयाने उपांत्य फेरीच्या किंचित आशा पल्लवित होतील. हे बोलायला सोपे आहे. अफगाण संघ निराशेत असलेल्या भारतावर वर्चस्व गाजविण्याची क्षमता बाळगतो. अलीकडे भारताबाबत ‘निडर’ असा शब्द वापरला जायचा. पण टी-२० सारख्या प्रकारात धडाकेबाज खेळाची गरज असताना आपला संघ भीती बाळगून खेळतो, असे निदर्शनास येते. विजयाचा प्रयत्न करताना पराभव मिळाला तरी भीत नाही, असे काही महिन्यांआधी कोहली आणि शास्त्री म्हणायचे. तेव्हा पराभवानंतरही आपण सुरक्षित असतो, तेव्हा बोलायला या गोष्टी चांगल्या वाटतात, या गोष्टी सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे.
उपांत्य फेरीच्या आशा बाळगण्यासाठी अफगाण, स्कॉटलॅन्ड आणि नामीबिया यांच्याविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील. न्यूझीलंडने एक सामना गमावणे हे भारतासाठी लाभदायी असेल. अफगाण संघ सहज पराभूत होणारा नाही. दोन वर्षांआधी वन डे विश्वचषकात याच संघाने भारताला जवळपास पराभवाच्या खाईत ढकलले होते. त्यावेळी अतिउत्साह आणि अनुभवहिनतेमुळे अफगाण संघ जिंकू शकला नव्हता. टी-२० प्रकारात हा संघ चांगलाच आहे. तरीही शंका येते की, पाक आणि न्यूझीलंडविरुध्द हरल्यानंतर लढण्याची जिद्द तसेच विजयाची भूक कायम आहे? लवकरच याचे उत्तर मिळेल. (टीसीएम)