Join us  

वीरूचा पोलिसांना हटके सल्ला; लॉकडाऊन मोडणाऱ्यांना शिक्षा देऊ नका, तर...

नियम मोडणाऱ्यांना ठाबशा काढण्यापासून ते कान पकडण्याची शिक्षाही पोलिसांकडून मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 3:15 PM

Open in App

जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 18,429 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 65,739 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 32,895 जणं बरी झाली आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 17,615 झाला असून त्यापैकी 559 जणांचा मृत्यू झाला आहे. 2855 लोकं बरी झाली आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. तरीही काही लोकं लॉकडाऊनचा नियम मोडताना पाहायला मिळत आहे. त्यांना उठाबशा काढण्यापासून ते कान पकडण्याची शिक्षाही पोलिसांकडून मिळत आहे. पण, टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं या लोकांना शिक्षा न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानी नियम मोडणाऱ्यांसाठी वेगळीच शिक्षा पोलिसांना सुचवली आहे.

सेहवागनं लिहीलं की,''लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी मी पोलिसांना एक विनंती करू इच्छितो. नियम मोडणाऱ्यांना शिक्षा न देता त्यांना कोरोना रुग्णांची सेवा करण्यास सांगा. तसंही नियम मोडणाऱ्यांना वाटतं की कोरोना त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध

ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

MS Dhoni चं लक्ष वेधण्यासाठी साक्षीला काय काय करावं लागतंय? पाहा फोटो

संतांची निर्घृण हत्या; भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण म्हणतो...

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप अन् आशिया कप स्पर्धेपेक्षा आयसीसीलाही IPL 2020 महत्त्वाची; पाकिस्तानी खेळाडू बरळला

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविरेंद्र सेहवाग