PCB Fines Naseem Shah 2 Crore For Comments On Female Chief Minister Maryam Nawaz : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याला एका ट्विटसाठी कोट्यवधीची किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त ट्विटमुळे पाक क्रिकेटवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याला PCB नं २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या मीडिया सल्लागाराला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. आता तो PCB शी संलग्नित असलेल्या कोणत्याही खेळाडूसोबत काम करू शकणार नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान क्रिकेटरला एका ट्विटमुळे मोजावे लागले २ कोटी
PCB ने सोमवारी अधिकृत निवेदनात सांगितले की, नसीम शाहने केलेल्या व्यंगात्मक ट्विटमुळे त्याच्या केंद्रीय करारातील अटींचं उल्लंघन झालं आहे. बोर्डाच्या शिस्तभंग समितीनं त्याला सोशल मीडियावर गैरजबाबदार वर्तन केल्याबद्दल दोषी ठरवल असून २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
PSL 2026 : फखर झमानसह हॅरिस रौफ अन् शाहीन आफ्रिदीही दोषी! Ball Tampering प्रकरणात तिघांवरही कारवाई होणार?
नेमकं काय घडलं? कोणतं ट्विट महागात पडलं?
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला २६ मार्चपासून सुरुवात झाली. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या उद्घाटन सामन्यात पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ पीसीबीच्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. यावर नसीम शाहच्या अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आले होते. ज्यात “त्यांना लॉर्ड्सच्या राणीप्रमाणे का वागवलं जात आहे?” असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या ट्विटमुळे वाद निर्माण झाल्यावर क्रिकेटरनं आपले अकाउंट हॅक झाल्याचे सांगत यात माझी काही चूक नाही, असा दावा केला होता. पण चौकशीनंतर त्याला दोषी ठरवण्यात आले असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडिया सल्लागारावर टांगती तलवार
PCB ने हेही स्पष्ट केले आहे की, कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना पाकिस्तानी क्रिकेटरन या प्रकरणात माफीही मागितली आहे. पण त्याने करारातील नियमांच उल्लंखन केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर नसीम शाहने आपल्या सोशल मीडिया सल्लागाराला पदावरून दूर केलं असून PCB त्याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या तयारीत आहे.