Join us

BCCI बेभरवशी, पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज नाही; PCB अध्यक्षांची टीका

पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही ( PCB) उडी मारली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 12:05 IST

Open in App

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी निधीची गरज आहे आणि त्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वन डे क्रिकेट सामन्यांची मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या डोक्यात ही कल्पना आली होती. त्यावरून बरेच वाद सुरू आहेत. आता यात पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही ( PCB) उडी मारली आहे. 

Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!

PCBचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले की,''BCCI बेभरवशी आहे, पाकिस्तानचं क्रिकेट त्यांच्यावर विसंबून नाही. भारत-पाकिस्तान मालिका झाली, तर चांगलंच आहे. पण, तोपर्यंत आयसीसी स्पर्धेत त्यांचा मुकाबला करतो, हेच पुरेसं आहे. आम्हाला क्रिकेटमध्ये रस आहे आणि क्रिकेट व राजकारण आम्ही वेगळेच ठेवतो.''  त्यांनी पुढे असा दावा केला की,''भारताविरुद्ध मालिका न होण्याचा फटका नक्की बसतो, परंतु आम्ही त्याचा विचार करत नाही. पण, त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकतो, आम्हाला जीवंत राहण्यासाठी त्यांची गरज नाही.'' 

टॅग्स :पाकिस्तानबीसीसीआय