PCB Reaction on Jason Gillespie Accusation : पाकिस्तान क्रिकेट संघ, या संघातील खेळाडू आणि पाक क्रिकेट बोर्डाचा कारभार नेहमीच नकारात्मक गोष्टींमुळे राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरनं केलेल्या आरोपाची भर पडली आहे. पाकचा माजी कोट जेसन गिलेस्पी याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केला आहे. पाक संघाला प्रशिक्षण दिल्याचा मोबदलाच मिळाला नाही, असे तो म्हणाला आहे. यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घेऊयात काय आहे हे नमकं प्रकरण? अन् पाकिस्तान बोर्डाने काय म्हटलंय? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजूनही मला पैसे मिळाले नाहीत; गेलेस्पीचा पाक बोर्डावर आरोप
जेसन गिलेस्पी याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केली होती. यात त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाला कोचिंग केल्याचा मोबदला अजूनही मिळाला नाही, असा उल्लेख त्याने केला आहे. पाकिस्तानकडून अजूनही मोबदल्याचे पैसे येणे बाकी आहे. गॅरी कस्टर्न आणि मला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक स्वप्न दाखवले. पण एक मॅच गमावल्यावर सगळं संपलं, असा उल्लेख करत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
सहा महिन्यात राजीनामा देण्याची आली होती वेळ
एप्रिल २०२४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियन दिग्गज जेसन गिलेस्पी आणि दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज गॅरी कस्टर्न यांच्यासोबत दोन वर्षांचा करार केला होता. गिलेस्पीकडे रेड बॉल क्रिकेटमधील मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती. तर दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाला व्हाइट बॉल क्रिकेटसाठी मुख्य प्रशिक्षक नेमण्यात आले होते. पण दोघांनी सहा महिन्यातच राजीनामा दिला. अधिकार काढून घेतल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचा मुद्दाही चर्चेत राहिला.
स्पष्टीकरण देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने फेटाळला आरोप
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. माजी मुख्य प्रशिक्षकाने वेतन थकबाकीसंदर्भात केलेला दावा आम्ही फेटाळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पीसीबी प्रवक्त्याने म्हटलंय की, राजीनामा देण्याआधी माजी मुख्य प्रशिक्षकाने चार महिन्यांचा नोटीस पीरियड' सर्व्ह न करता तडकाफडकी राजीनामा दिला. करारात नोटीस पीरियड द्यावा लागेल याचा उल्लेख होता. कराराचे उल्लंघन करण्यात आले. असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जेसन गिलस्पीचे आरोपात तथ्य नाही असे म्हटले आहे.