Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Points Table : अय्यरच्या PBKS चा जलवा! KKR च्या पहिल्या विजयाचा MI ला फटका

कोलकाताच्या पहिल्या विजयासह मुंबई इंडियन्स तळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:04 IST

Open in App

आयपीएल २०२६ च्या हंगामातील रविवारी  १९ एप्रिलला झालेल्या डबल हेडरच्या लढतीनंतर पंजाब किंग्सच्या संघाने सलग पाचव्या विजयासह आपले अव्वलस्थान भक्कम केले आहे. दुसरीकडे रविवारच्या दुपारच्या सत्रातील कोलकता नाईट रायडर्सच्या पहिल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत एकदम तळाला गेला आहे. इथं एक नजर टाकुयात पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ यांच्यातील लढतीनंतर कोणता संघ गुणतालिकेत कितव्या स्थानावर आहे? हा आठवडा कोणत्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल यासंदर्भातील सविस्तर माहिती....

कोलकाताच्या पहिल्या विजयासह मुंबई इंडियन्स तळाला

आयपीएल स्पर्धेतील चौथ्या आठवड्याची सुरुवात (सोमवार)  मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीनं होणार आहे. यंदाच्या हंगामात सलामीचा सामना जिंकल्यावर मुंबई इंडियन्सवर सलग चार पराभवाची नामुष्की ओढावली आहे. त्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात तळाला आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यासह या आठवड्यात ते चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही मैदानात उतरणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकून त्यांना चांगली मुसंडी मारता येईल.

IPL 2026 Orange Cap Race : 'या' परदेशी बॅटरनं कोहली-गिलला टाकले मागे; वैभव सूर्यवंशीचं काय?

पंजाब किंग्स अव्वल! धावगतीच्या जोरावर सनरायझर्स टॉप ४ मध्ये टिकले

आघाडीच्या चारमध्ये असलेल्या सर्व संघांनी सहा सामने खेळले आहेत. यात पंजाब किंग्स एकमेव असा संघ आहे ज्यांनी एकही पराभव न स्विकारता ५ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ११ गुण खात्यात जमा करत गुणतालिकेत अव्वलस्थान मजबूत केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघांनी  ६ पैकी ४ विजय आणि २ पराभवासह ८ गुणांच्या कमाई केली असून उत्तम धावगतीच्या जोरावर RCB चा संघ दुसऱ्या तर RR तिसऱ्या स्थानावर आहे. SRH च्या संघाने ६ सामन्यातील ३ पराभव आणि ३ विजयासह ६ गुण मिळवून अव्वल चारमध्ये आपले स्थान टिकवले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांनी ५ सामन्यातील ३ विजय आणि २ पराभवासह ६ गुण खात्यात जमा केले असून दोन्ही संघ SRH पाठोपाठ पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. 

चेन्नई सुपर किंग्ससह मुंबई इंडियन्सही तळाला

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जाएंट्स संघ ६ सामन्यातील २ विजय आणि ४ पराभवासह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सर्वाधिक ७ सामने खेळले असून यात एक विजय आणि एक अनिर्णित सामन्यासह हा संघ ३ गुणांसह नवव्या तर MI ५ सामन्यातील एका विजयासह २ गुण खात्यात जमा करून दहाव्या क्रमांकावर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Points Table: Iyer's PBKS Dominates, MI Suffers After KKR Win

Web Summary : PBKS tops the IPL 2026 points table after their fifth consecutive win. KKR's victory pushes MI to the bottom. RCB and RR follow closely. CSK and LSG are near the bottom, while KKR and MI hold the last two spots.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्समुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद