Join us  

पठ्ठ्याचं सर्वात जलद त्रिशतक; ३९ वर्षांपूर्वीचा रवि शास्त्रीचा रेकॉर्ड मोडला

तन्मयने अग्रवालने सर्वात जलद त्रिशतक झळकावून भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रवि शास्त्री यांचाही रेकॉर्ड मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 1:10 PM

Open in App

भारतात सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या चालू हंगामात तन्मय अग्रवालचे नाव चर्चेचं विषय बनले आहे. हैदराबादच्या संघासोबत खेळताना त्याने २१ षटकार आणि ३३ चौकारांसह १४७ चेंडूत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जगातील सर्वात जलद त्रिशतक ठोकून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. एवढेच नाही तर तन्मयने आपल्या खेळीदरम्यान असे अनेक विक्रम केले, ज्यामध्ये वीरेंद्र सेहवागचा विक्रमही मोडला. तर, भारताचा माजी फलंदाज अष्टपैलू खेळाडू रवि शास्त्री यांचा ३९ वर्षांपूर्वीचाही रेकॉर्ड मोडला आहे.  

तन्मयने अग्रवालने सर्वात जलद त्रिशतक झळकावून भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रवि शास्त्री यांचाही रेकॉर्ड मोडला. तन्मयने ११९ चेंडूत २०० धावा जगातील सर्वात गतीमान द्विशतक करण्याच्या यादीत दुसरं स्थान पटकावले तर भारतातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. तन्मयने द्विशतकानंतर केवळ २८ चेंडूत आपलं तिसरं शतक पूर्ण केलं आहे. यापूर्वी, ३९ वर्षांपूर्वी रवि शास्त्री यांनी सन १९८४-८५ मध्ये १२३ चेंडूत द्विशतक झळकावले होते. दरम्यान, अफगाणिस्तानचा शफीकुल्लाह शिनवारीने २०१७-१८ मध्ये बूस्ट रिजियनविरुद्ध ८९ चेंडूत द्विशतक झळकावले होते. काबुल येथे हा सामना झाला होता. 

या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना तन्मनये मी ठरवून काहीही केलं नाही, प्री प्लॅन्ड काहीही नव्हतं, खेळत-खेळत हे झालं, असे तो म्हणाला. मी केवळ चांगली फलंदाजी करायची आहे, एवढं ठरवून मैदानात उतरलो होतो, असेही त्याने म्हटले.

रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात अरुणाचल प्रदेश संघाला पहिल्या दिवशी हैदराबादने १७२ धावांत गुंडाळले. यानंतर हैदराबादकडून सलामीला आलेल्या तन्मय अग्रवालने कर्णधार राहुल सिंगसह दमदार फटकेबाजी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद त्रिशतक झळकावले. दिवसअखेर तो १६० चेंडूंत ३३ चौकार आणि २१ षटकारांसह ३२३ धावांवर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय कर्णधार राहुलने १०५ चेंडूंत २६ चौकार आणि तीन षटकारांसह १८५ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने पहिल्या दिवशी ४८ षटकांत १ गडी गमावून ५२९  धावा केल्या होत्या.

तन्मयने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को मरैसचा १९१ चेंडूंत ३०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. २०१७ मध्ये बॉर्डर संघाकडून खेळताना मार्कोने इस्टर्न प्रोव्हिन्सविरुद्ध प्रथण श्रेणी क्रिकेटमधील वेगवान त्रिशतकाची नोंद केली होती. तन्मयने शइवाय रवी शास्त्री यांचा ३९ वर्षांपूर्वीचा एक विक्रमही मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतकाचा विक्रम तन्मने ११९ चेंडूंच्या खेळीसह नावावर केला. इतिहासातील हे दुसरे वेगवान द्विशतक ठरले. त्याने विरेंद्र सेहवागचा विक्रमही मोडला. सेहवाने २७८ चेंडूंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिनशे धावा केल्या होत्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील वेगवान त्रिशतकवीर

१४७ चेंडू - तन्मय अग्रवाल ( हैदराबाद वि. अरुणाचल प्रदेश, २०२४) १९१ चेंडू - मार्को मरैस ( बॉर्डर वि. इस्टर्न प्रोव्हिन्स, २०१७-१८) २३४ चेंडू - केन रुथरफोर्ड ( न्यूझीलँडर्स वि. डीबी क्लोज, १९८६)  २४४ चेंडू - व्हिव्हियन रिचर्ड्स ( सोमरसेट वि. वॉर्विकशायर, १९८५)२४४ चेंडू - कुसल परेरा ( कोल्ट क्रिकेट क्लब वि. सरासेन्स स्पोर्ट्स क्लब, २०१२-१३)  

कोण आहे तन्मय अग्रवाल?

तन्मयचा जन्म ३ मे १९९५ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रुची असल्याने तन्मयला हैदराबादच्या अंडर-१४ संघात प्रथम स्थान मिळाले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि हैदराबादसाठी अंडर-१६, अंडर-१९, अंडर-२२ आणि अंडर-२५ अशा सर्व वयोगटांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले. तन्मयने २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आत्तापर्यंत त्याने हैदराबादसाठी ५६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३५०० हून अधिक धावा केल्या आहेत. 

टॅग्स :रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघमुंबईहैदराबाद