Pathum Nissanka Century He Break Virat Kohli Record : टी २० आशिया कप स्पर्धेतील ग्रुप स्टेजमधील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंका याने विक्रमी खेळी साकारली. श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंका याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने अभिषेक शर्माच्या दमदार अर्धशतकासह तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारत श्रीलंकेसमोर २०३ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग श्रीलंकेच्या सलामीवीरानं यंदाच्या हंगामातील पहिलं शतक झळकावले. ५२ चेंडूत शतक साजरे करण्याआधी त्याने विराट कोहलीचाही मोठा विक्रम मोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं मोडला किंग कोहलीचा 'विराट' विक्रम
टी-२० आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. शतक साजरे करण्याआधीच पथुम निसंकानं भारतीय दिग्गजाला मागे टाकले. पाचव्यांदा त्याने आशिया चषक स्पर्धेत ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम करून दाखवलाय, कोहलीनं आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत चार वेळा फिप्टी प्लसचा डाव साधला होता.
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
टी २० आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक फिफ्टी प्लस धावा करणारे फलंदाज
- पथुम निसंका -१२ डावात ५ वेळा
- विराट कोहली - ९ डावात ३ वेळा
- मोहम्मद रिझवान - ६ डावात ३ वेळा
- कुसल मेंडिस -१२ डावात ३ वेळा
- अभिषेक शर्मा - ६ डावात ३ वेळा