Join us

Pat Cummins MI vs KKR IPL 2022 : मी फक्त चेंडू हवेत उडताना पाहत होतो, विश्वासच बसत नव्हता; श्रेयस अय्यरकडून पॅट कमिन्सचे कौतुक

पॅट कमिन्सने ( Pat Cummins) पहिल्याच आयपीएल सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि १४ चेंडूंत अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 00:22 IST

Open in App

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर  मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सनी पराभवाची हॅटट्रिक साजरी केली. पाकिस्तान दौऱ्यानंतर पुन्हा मैदानावर उतरलेल्या पॅट कमिन्सने ( Pat Cummins) पहिल्याच आयपीएल सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि १४ चेंडूंत अर्धशतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या फटकेबाजीमुळे कोलकाताने १६ षटकातच सामना जिंकला. दरम्यान, सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पॅट कमिन्सचं कौतुक केलं. 

"मी फक्त चेंडू हवेतून उडताना पाहत होतो. माझा विश्वासच बसत नव्हता. तो प्लॅनप्रमाणेच खेळत होता, परंतु आम्ही प्लॅन पूर्ण करण्यापूर्वीच त्यानं सामना संपवला. जेव्हा मी फलंजाजीला गेलो तेव्हा वेंकटेशला मी थोडा संयमानं खेळण्यास सांगितलं. पहिल्या चारमध्ये खेळणारे फलंदाज, एकाला अँकर खेळावा लागोत. आपण आतापर्यंत सर्वोत्तम खेळ खेळलो नाही असं मी म्हटलं. दोन्ही डावांच्या पॉवरप्लेमध्ये खेळपट्टी सारखीच होती. मी जेव्हा फलंदाजीला गेलो तेव्हा चेंडू उसळी घेत होता," असं श्रेयस अय्यर म्हणाला.

अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स हे तगडे फलंदाज माघारी परतले असताना पॅट कमिन्स वादळासारखा मैदानावर उतरला अन् मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. IPL 2022मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या पॅट कमिन्सने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. आयपीएलमधील हे सर्वात जलद ( १४ चेंडू) अर्धशतक झळकावण्याच्या लोकेश राहुलच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. लोकेशने २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. १५ चेंडूंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कमिन्सने आपल्या नावावर केला. त्याने १५ चेंडूंत नाबाद ५६ धावा करताना रोहित शर्माचा २०१५ सालचा ४२ धावांचा विक्रम मोडला. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App